|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भरणेत अज्ञात टेम्पोची दुचाकीस्वारास धडक, स्वार गंभीर

भरणेत अज्ञात टेम्पोची दुचाकीस्वारास धडक, स्वार गंभीर 

प्रतिनिधी/ खेड

मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलानजीक एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका अज्ञात टेम्पोने दुचाकीस दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रविवारी दुपारी 2 वाजता घडली. दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी येण्यास विलंब केल्याने संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग अर्धातास रोखून धरला.

रवींद्र शिंदे (35, रा. भरणे), मुलगा आयुष शिंदे अशी जखमींची नावे असून रवींद्र शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना एस.एम.एस. रूग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे. रवींद शिंदे हे पत्नी व मुलासह दुचाकीवरून भरणेहून वेरळच्या दिशेने जात होते. ते जगबुडी नदीपुलानजीक आले असता चिपळूणच्या दिशेने येणाऱया एका अज्ञात टेम्पोचालकाने समोरील एस.टी.बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक देऊन अपघात केला. अपघातानंतर टेम्पोचालकाने लागलीच वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले.

अपघाताचे वृत्त कळताच भरणेतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना लागलीच नजीकच्या एस.एम.एस. रूग्णालयात हलवले. दरम्यान, अपघाताची माहिती भरणे चौकीतील पोलिसांना देऊनही घटनास्थळी येण्यास विलंब केल्याने संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग अर्धा तास रोखून धरला. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी 2 वाजून 53 मिनिटांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तसेच अज्ञात टेम्पोचे वर्णन कशेडीसह रोहा पोलिसांना दिले. पोलिसांनी संतप्त ग्रामस्थांना शांत करत  खोळंबलेली वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात अज्ञात टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

।।।।।।,

Related posts: