|Monday, February 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » वादग्रस्त विधेयकावरून राजस्थान विधानसभेत गदारोळ

वादग्रस्त विधेयकावरून राजस्थान विधानसभेत गदारोळ 

जयपूर

 राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सोमवारी विरोधकांच्या गोंधळातच सुरू झाले. काँग्रेसने सरकारी कर्मचाऱयांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याच्या अगोदर सरकारची मंजुरी घेण्यासंबंधीच्या विधेयकात दुरुस्तीचा मुद्दा मांडला. तर विधानसभा अध्यक्ष कैलास मेघवाल यांनी कामकाजात अडथळा आणू नये असे काँग्रेसच्या आमदारांना उद्देशून म्हटले. परंतु काँग्रेसच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. वसुंधरा राजे सरकारने आणलेल्या विधेयकातील अनेक तरतुदी घटनेशी विसंगत असल्याचे बोलले जाते. राज्य सरकार अधिवेशनात 6 विधेयके सादर करणार आहे. तर वादग्रस्त विधेयकाच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली.

विरोधकांच्या टीकेदरम्यान सरकारने बचावाची भूमिका घेतली. तर काँग्रेसची भूमिका आक्रमक दिसून आली. अधिवेशन सुरू होण्याअगोदर भाजप आमदारांची बैठक झाली, यात वसुंधरांनी एकजुटता दाखविण्याचे आवाहन केले.

लोकप्रतिनिधींच्या विरोधात गुन्हा नेंदविण्याच्या अगोदर सरकारची मंजुरी घेण्याशी संबंधित विधेयक अधिवेशनात सादर होणार आहे. विधेयकाद्वारे लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, न्यायाधीशांना चौकशीपासून वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होतोय. तसेच गुर्जर आरक्षण आणि शेतकऱयांच्या कर्जमाफीचा मुद्दा अधिवेशनात गाजणार आहे. वादग्रस्त विधेयकाला काँग्रेसने विरोध दर्शविल. विधेयकाच्या विरोधात काँग्रेसने सोमवारी विधानसभा ते राजभवनपर्यंत रॅली काढली.

 राहुल गांधी यांनी रविवारी वसुंधरा राजेंना लक्ष्य करत ट्विट केला. मॅडम मुख्यमंत्री, आम्ही 21 व्या शतकात राहतो, हे 2017 आहे, 1817 नव्हे असे राहुल यांनी नमूद केले. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट यांनी जनतेने भाजपला मनमानी करण्यासाठी प्रचंड बहुमत दिले नसल्याची टिप्पणी केली.

Related posts: