|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अफगाणचे राष्ट्रपती गनी एका दिवसाच्या भारत दौऱयावर

अफगाणचे राष्ट्रपती गनी एका दिवसाच्या भारत दौऱयावर 

नवी दिल्ली

 अफगाणिस्तानचे राष्ट्रपती मोहम्मद अशरफ गनी मंगळवारी भारत दौऱयावर येतील. राष्ट्रपती गनी आपल्या एकदिवसीय अधिकृत दौऱयावर भारतात येणार असून यावेळी दोन्ही देशांदरम्यान उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चेची सुरुवात होईल. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची गनी भेट घेणार आहेत. यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. पंतप्रधान मोदी गनी यांच्या स्वागताप्रित्यर्थ मेजवानीचे आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाला विदेशमंत्री सुषमा स्वराज देखील उपस्थित असतील. यानंतर विवेकानंद इंटरनॅशनल फौंडेशनमध्ये ते जनसमुदायाला संबोधित करतील. अमेरिकेचे विदेशमंत्री रेक्स टिलरसन यांच्या दौऱयाच्या अगोदर गनी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो.

अफगाणिस्तानच्या विकासात भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. अफगाणमध्ये भारताने आपली भूमिका वाढवावी असे आवाहन अमेरिकेने केले.