|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » टोटेनहॅमकडून लिव्हरपूल पराभूत

टोटेनहॅमकडून लिव्हरपूल पराभूत 

वृत्तसंस्था/ विम्बले

सुमारे 80 हजार फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीत रविवारी येथे झालेल्या इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात हॅरी केनच्या दोन गोलांच्या जोरावर टोटेनहॅम हॉटस्परने लिव्हरपूलचा 4-1 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केला. 2017 च्या इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल हंगामात हॅरीकेनने आतापर्यंत आठ गोल नोंदविले आहेत.

या सामन्यात मध्यंतरापर्यंत टोटेनहॅमने लिव्हरपूलवर 3-1 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या पूर्वार्धात टोटेनहॅमतर्फे हॅरी केन, सॉन हेयुंग मिन आणि अली यांनी प्रत्येकी एक गोल केला. लिव्हरपूलचा एकमेव गोल मोहम्मद सलाहने नोंदविला. उत्तरार्धात हॅरी केनने संघाचा चौथा तर वैयक्तिक दुसरा गोल करून लिव्हरपूलचे आव्हान संपुष्टात आणले. टोटेनहॅमचा हा लिव्हरपूलवरील सलग चौथा विजय आहे. या विजयामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात मँचेस्टर सिटी पहिल्या स्थानावर असून मँचेस्टर युनायटेड दुसऱया स्थानावर आहे. आता टोटेनहॅमने 20 गुणांसह मँचेस्टर युनायटेडसमवेत संयुक्त दुसरे स्थान मिळविले आहे. लिव्हरपूल 13 गुणांसह नवव्या स्थानावर आहे.

Related posts: