|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पुरातन अभिलेखा खात्यासाठी लवकरच नवीन ईमारत

पुरातन अभिलेखा खात्यासाठी लवकरच नवीन ईमारत 

प्रतिनिधी/ पणजी

पणजी मळा येथील स्थायिक असलेली अभिलेख आणि पुराभिलेख खात्याची ईमारत पुढील दोन वर्षात नवीन बांधण्यासाठी सरकार जागा शोधत आहे. लवकरच या खात्याचे स्थलांतर होणार आहे. अशी माहिती या खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. या खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी काल या खात्याला भेट दिली व ईमारतीची पाहणी केली. तसेच आगी विषयी ही ईमारत सुरक्षित आहे काय याची पाहणी केली. यावेळी अग्नीशमन दलाचे संचालक अशोक मेनन होते.

गोव्याची खरी ओळाख ही गोव्याच्या अभिलेख आणि पुराभिलेखामध्ये आहे. अनेक इतिहासिक स्थळे वारसा स्थळे जपून ठेवले तर गोव्याची खरी ओळख टिकून राहणार आहे. त्यासाठी होईल तेवढे प्रयत्न केले जाणार आहे. या खात्यामध्ये अनेक पुरातन लेखाची माहिती आहे. गोव्यातील अनेक वारसा स्थाळांची माहिती आहे ही वारसास्थळे विकसित केली जाणार आहे. त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असे पुढे ते म्हणाले.

दोन वर्षात ईमारत बांधणार

 अभिलेखा आणि पुराअभिलेकाची ही ईमारती खूप जूनी आहे. पणजीत ही ईमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही. फातोर्डा येथे जागा आहे पण यासाठी मुख्यमंत्र्याकडून परवानगी घ्यावी लागेल. जर दक्षिण गोव्यात या खात्याची ईमारत आणली तर सर्व कामगारांना पुन्हा तिकडे जावे लागणार आहे त्यामुळे पणजी शहरातच या ईमारतीसाठी जागा शोधण्याचे काम सुरु आहे सुमारे 600 चौरस मीटर जागा या ईमारतीसाठी पाहीजे.

सप्तकोटेश्वर मंदिराच्या दुरुस्तीसाठी 4.5 कोटी

 नार्वे येथील पुरातन काळातील प्रसिद्ध अशा सप्तकोटेश्वर मंदिरासाठी सरकारकडून 4.5 कोटी रुपये खर्च करुन दुरुस्ती केली जाणार आहे. या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली होती त्यामुळे हे मंदीर प्रसिद्ध झाले आहे. 6 एप्रिल 2019 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. राज्यातील सर्व वारसा स्थळांचे संर्वधन केले जाणार आहे. सर्व किल्ल्यांचे जतन केले जाणार आहे. या अभिलेखाच्या जतनाचे संरक्षण केले जाणार आहे. त्यांचे संरक्षण केले जाणार आहे, असे यावेळी मंत्री विजय सरदेसाई म्हणाले.

आज गोव्यात अनेक परप्रातीयांकडून गोव्यातील जमिनी खरेदी केल्या जात आहे sत्याच्यावर कुठेतर निर्बेध आणला पाहीजे. गोवा हे लहान राज्य असल्याने या जागा  राखून ठेवणे गरजेचे आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बोलणार आहे. राज्यातील वारसा स्थेळे ही गोव्यची खरी संपत्ती आहे असेही यावेळी मंत्री सरदेसाई म्हणाले.