|Sunday, June 16, 2019
You are here: Home » Top News » आग्रा एक्सप्रेस वेवर हवाई दलाचा युद्धाभ्यास

आग्रा एक्सप्रेस वेवर हवाई दलाचा युद्धाभ्यास 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तर प्रदेशमधील आग्रा एक्सप्रेस वेवर हवाई दलाच्या विमानांचा सराव सुरू झाला आहे. युद्ध किंवा युद्धसदृश्य कारवायांसाठी सज्ज राहण्यासाठी हवाई दलाकडून हा सराव केला जात आहे. विशेष म्हणजे यंदा हवाई दलाचे सी-130जे सुपर हर्क्युलिस हे वाहतुक विमानदेखील आग्रा एक्सप्रेस वेवर उतरले आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सरावाला सुरूवात झाली असून या सरावामध्ये एकूण 20 विमानांचा समावेश आहे.

वाहतूक विमान सी-130 जे सुपर हर्क्युलिसने टचडाऊन करताच अग्रा एक्सप्रेस वेवर हवाई दलाच्या सरावाला सुरूवात झाली. हर्क्युलिस विमानाने लँडिंग केल्यावर त्यातून गरूड कमांडो एक्सप्रेस वेवर उतरले. यानंतर संपूर्ण रनवे ताब्यात घेतला. यानंतर साडे तीन किलोमीटरच्या पट्टय़ात हवाई दलाची विमाने उतरण्यास सुरूवात झाली. कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याचा अभ्यास म्हणून हवाई दलाची विमाने उतरण्यास सुरूवात झाली. कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याचा अभ्यास म्हणून हवाई दलाकडून आग्रा एक्सप्रेस वेवर सराव सुरू आहे. वाहतुक विमान सी-130 जे सुपर हर्क्युलिस सरावाचे मुख्य आकर्षण ठरले आहे.