|Thursday, August 22, 2019
You are here: Home » leadingnews » ३ वर्षांपासून भारताच्या प्रगतीला वेग : जेटली

३ वर्षांपासून भारताच्या प्रगतीला वेग : जेटली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सध्या देशामध्ये मोठे बदल केले जात आहेत. या मोठ्या बदलांचा नकारात्मक परिणाम फक्त काही काळांसाठी असेल. मात्र, त्याचा फायदे दीर्घकाळ असेल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी व्यक्त केला. तसेच मागील तीन वर्षांपासून भारताच्या प्रगतीला वेग आल्याचेही ते म्हणाले.

दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत जेटली बोलत होते. ते म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात विकासकामांवर खर्च वाढवला आहे. भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. सध्या देशात जे मोठे बदल होत आहेत, त्यांचा नकारात्मक परिणाम असला तरी या मोठ्या बदलांचे परिणाम भविष्यासाठी चांगले आहेत. तसेच जीएसटीच्या विवरणपत्रावर लावण्यात आलेले विलंब शुल्क करदात्यांना परत करण्यात येणार आहे. म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये विवरणपत्र भरताना व्यापाऱ्यांना जो कर भरावा लागला होता तो सरकार आता परत करणार आहे. दरम्यान, यापुढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्यास भारत सज्ज असेल असेही जेटली म्हणाले.