|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सरकारच्या घोषणेमुळे बँकिंग क्षेत्रात खरेदी

सरकारच्या घोषणेमुळे बँकिंग क्षेत्रात खरेदी 

बीएसईचा सेन्सेक्स 101, एनएसईचा निफ्टी 23 अंशाने मजबूत

वृत्तसंस्था / मुंबई

मंगळवारी बाजारात सामान्य वाटचाल दिसून आली. बाजाराची सुरुवात तेजीने झाली, मात्र त्यानंतर बाजार घसरत गेला. दिवसअखेरीस निफ्टी आणि सेन्सेक्स 0.25 टक्क्यांनी मजबूत झाले. सरकारकडून बँकिंग क्षेत्राविषयी मोठी घोषणा करण्यात येणार असल्याने बँक समभागात मजबूती आली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतमाला प्रकल्पाला मंजुरी दिल्याने इन्फ्रा कंपन्यांच्या समभागात खरेदी झाली.

मंगळवारच्या व्यवहारदरम्यान निफ्टी 10,237 आणि सेन्सेक्स 32,670 पर्यंत पोहोचला होता. कमजोरी असताना निफ्टी 10,182 आणि सेन्सेक्स 32,508 पर्यंत घसरला होता. दिवसअखेरीस निफ्टी 10,200 आणि सेन्सेक्स 32,600 च्या वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात काही प्रमाणात खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.2 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.6 टक्क्यांनी मजबूत झाला.

बीएसईचा सेन्सेक्स 101 अंशाने वधारत 32,607 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 23 अंशाच्या तेजीने 10,208 वर बंद झाला.

बँकिंग, एफएमसीजी, मीडिया, ऊर्जा आणि तेल आणि वायू समभागात खरेदी झाली. बँक निफ्टी 0.5 टक्क्यांनी वधारत 24,222 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 3.8 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.3 टक्के आणि मीडिया निर्देशांक 3.6 टक्क्यांनी मजबूत झाले. बीएसईचा ऊर्जा निर्देशांक 1.3 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 0.6 टक्क्यांनी वधारला. आयटी, औषध, वाहन आणि ग्राहकोपयोगी वस्तू समभागात दबाव होता.

दिग्गज समभागांची कामगिरी

झी एन्टरटेनमेन्ट, एशियन पेन्ट्स, एसबीआय, यूपीएल, एनटीपीसी, ओएनजीसी, हिंदुस्थान युनि 7-1.8 टक्क्यांनी वधारले. एचसीएल टेक, इन्डसइंड बँक, टेक महिंद्रा, येस बँक, टाटा मोटर्स, टाटा मोटर्स डीव्हीआर, इन्फोसिस, सन फार्मा, ल्यूपिन 2.4-1 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात आयडीबीआय बँक, सेल, बँक ऑफ इंडिया, सेन्ट्रल बँक, बर्जर पेन्ट्स 4.8-3.7 टक्क्यांनी मजबूत झाले. स्मॉलकॅप समभागात मेटालिस्ट फोर्जिन, सेन्ट गोबिन, गुफिन बायो, वॉटरबेस 20-12.7 टक्क्यांनी वधारले.