|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मायक्रोमॅक्स-व्होडाफोनकडून 4 जी स्मार्टफोन

मायक्रोमॅक्स-व्होडाफोनकडून 4 जी स्मार्टफोन 

 पुणे / प्रतिनिधी :

व्होडाफोन टेलिकम्युनिकेशन आणि मायक्रोमॅक्स मोबाईल कंपनीच्या वतीने भारतातील सर्वांत कमी किमतीतील म्हणजेच 999 रुपयातील 4 जी स्मार्टफोन व्होडाफोन सुपरनेट 4 जीसह सादर करण्यात आला आहे.

स्मार्टफोन ‘भारत 2 अल्ट्रा’ हा मायक्रोमॅक्सचा यशस्वी ‘भारत सिरीज मधला 4 जी स्मार्टफोन आहे. त्याचा मुख्य उद्देश सर्वोत्तम कॅमेरा, बॅटरी आणि नव्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी डिस्प्लेचे पर्याय आदी सुविधा माफफ दरात उपलब्ध करुन देणे हा आहे. ‘भारत 2 अल्ट्रा’ रिटेल आऊटलेट आणि व्होडाफोन दुकानात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून उपलब्ध होतील.

याविषयी अधिक माहिती देताना मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा म्हणाले, स्मार्टफोन वापरणाऱयांच्या पहिल्या पिढीच्या संपादनाचे ध्येय भारत सिरिजने समोर ठेवले आहेत. त्यासाठी व्होडाफोनबरोबर भागीदारी केल्याने स्मार्टफोनच्या स्वीकृतीतील पुढचा टप्पा गाठण्यास मदत होणार आहे.

 

Related posts: