|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चाळीस वर्षांनी वीज मिळूनही त्यांच्या नशिबातील अंधार सरेना

चाळीस वर्षांनी वीज मिळूनही त्यांच्या नशिबातील अंधार सरेना 

प्रतिनिधी /धारबांदोडा :

विजेसारख्या एका मूलभूत गरजेसाठी गरीब कुटुंबाची वन आणि वीज या दोन्ही खात्यांकडून कशी थट्टा केली जाते याचे संतापजनक उदाहरण म्हणजे साकोर्डा येथील वनक्षेत्रात वास्तव्यास असलेले गिरोडकर कुटुंब. तब्बल चाळीस वर्षे विजेसारख्या मूलभूत गरजेपासून वंचित राहिलेल्या या कुटुबाला चाळीस वर्षांनी वीज मिळाली खरी, पण वनखात्याच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्या नशिबी पुन्हा अंधारातच जगणे वाटय़ाला आले आहे.

  या कुटुंबाला वीज जोडणी मिळावी व साकोर्डा गाव शंभर टक्के वीज पुरवठादार ठरावे या उद्देशाने साकोर्डा पंचायतीने या कुटुंबाला ना हरकत दाखला दिलेला आहे.    कुटुंबप्रमुख वसंत गिरोडकर यांनी ही विजेची जोडणी मिळावी, यासाठी तब्बल एकवीस हजार रुपये पदरमोड करुन आवश्यक ती प्रक्रियाही पूर्ण केली आहे. तरीही चतुर्थीनंतर आणि आता पुन्हा दिवाळीनंतर असे दोनवेळा त्यांच्या घरातील वीज तोडून टाकण्यात आली आहे.

Related posts: