|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सहकारमंत्र्यांच्या गाडीसमोर बळीराजा आडवा…

सहकारमंत्र्यांच्या गाडीसमोर बळीराजा आडवा… 

पंढरपूर / प्रतिनिधी

श्री विठठल सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख आले होते. यावेळी कारखान्याच्या प्रवेशव्दाराजवळच बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी उसदर जाहीर करण्याची मागणी करीत सहकारमंत्र्यांची गाडी अडवली.

राज्यामध्ये अद्यापही उसदर नियंत्रण मंडळाची बैठक झाली नाही. तसेच शेतक-यांच्या उसाचा दर जाहीर झाला नाही. अशामध्ये कारखाने सुरू करायचे नाहीत. इतकेच काय तर उस दर जाहीर होईपर्यत सहकारमंत्र्यांना राज्यात फ्ढिरू देणार नाही, असा इशारा काही दिवसापूर्वी बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी दिलेला होता. त्याच अनुषंगाने शुक्रवारी विठठल सहकारी साखर कारखान्यावर गळीत हंगामाचा शुभारंभ करून कारखाने सुरू करायला निघालेल्या सहकारमंत्र्यांनाच बळीराजाच्या कार्यकर्त्यांनी अडवले.

आ. भारत भालके चेअरमन असलेल्या विठठल सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगमाच्या शुभारंभप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख आ. भालके यांच्याच वाहनामधून कारखान्यांवर येत होते. यावेळी विठठल कारखान्याच्या प्रवेशव्दाराजवळ पूर्वीपासून बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटनेकर तसेच जिल्हाध्यक्ष माउली हळणवर उपस्थित होते. यावेळी फ्ढक्त उस दर जाहीर करा मग मोळी टाका, अशी एकच घोषणा निनादत होती.

साधारणपणे दुपारी एकच्या सुमारास भाळवणी येथून आ. भालके यांच्या वाहनामधून सहकारमंत्र्यांचे आगमन विठठल कारखान्यांवर होत होते. यावेळी प्रवेशव्दाराजवळ काही बळीराजांचे शेतकरी कार्यकर्ते गाडीसमोर आडवे गेले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण तो असफ्ढल ठरला. त्यानंतर सहकारमंत्र्यांची गाडी थांबली गेली आणि त्यांनी आंदोलकांशी ओझरती चर्चा केली. संपूर्ण प्रकरणाबाबत बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर पोलिसाकडून कार्यकर्त्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.

उस दराच्या मुद्य्ांवरून परत एकदा राज्यांमध्ये शेतकरी संघटनाकडून आंदोलनाचे हत्यार उपसले जात आहे. याची झळ सुरूवातीलाच चक्क राज्याच्या सहकारमंत्र्यांना बसली. त्यामुळे याबाबत आता सरकार काही निर्णय घेते का? की शेतकरी संघटना उस दरांबाबत इतर अनेक संघटनाशी एकी करून आणखी आक्रमक होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related posts: