|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कणकुंबी परिसरातून हजारोंच्या संख्येने भाग घेणार

कणकुंबी परिसरातून हजारोंच्या संख्येने भाग घेणार 

बेळगाव / प्रतिनिधी

खानापूर म. ए. समितीतर्फे शुक्रवारी कणकुंबी भागामध्ये काळय़ा दिनाच्या सायकल फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी जागृती करण्यात आली. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांच्या नेतृत्त्वाखाली जनजागृती करण्यात आली. या जागृती फेरीमध्ये 400 हून अधिक म. ए. समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर नेहमीच अत्याचार करण्यात आलेला आहे. मागील 62 वर्षांपासून मराठी माणसाची होणारी ही गळचेपी थांबविण्यासाठी शिस्तबद्ध  व शांततेच्या मार्गाने सीमालढा लढविला जात आहे. या सीमा लढय़ाला बळकटी देण्यासाठी 1 नोव्हेंबरच्या काळय़ादिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. खानापूर तालुक्मयातील कणकुंबीबरोबरच माण, हुळंद, बेटणे, चिगुळे, पारवाड आदी गावांमध्ये पत्रके वाटून जागृती करण्यात आली.

यावेळी राजाराम गावडे, संजय नाईक, अमित पाटील, कृष्णा गावडे, राजू शिंदे, कृष्णा गावडे, कृष्णा महाले, महादेव नाईक, बाबू गावडे, लाडु नाईक, सुरेश गवस, महादेव गावडे, केशव डांगे, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, प्रकाश चव्हाण, नारायण कापर्डेकर, बी. बी. पाटील, मुरलीधर पाटील, महादेव घाडी यासह इतर कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.