|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘कार्तिकी’साठी 1300 एस.टी.बसेस

‘कार्तिकी’साठी 1300 एस.टी.बसेस 

पंढरपूर / वार्ताहर

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरातून 1300च्या आसपास जादांच्या एसटी बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. यासाठी संपूर्ण एसटी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती आगारप्रमुख मुकुंद दळवे यांनी दिली.    

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने येणाऱया भाविक भक्तांना चांगल्या प्रकारची वाहतूक व्यवस्था मिळावी यासाठी परिवहन महामंडळाचे डी. सी. रमाकांत गायकवाड यांच्या उप†िस्थत जुने एसटी स्टॅन्ड, पंढरपूर गेस्ट हाऊस येथे एकादशीच्या निमित्ताने आढावा बैठक पार पडली.

कार्तिकी एकादशीसाठी महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून भाविक भक्त येत असतात. एकादशीनिमित्त वारीसाठी येणाऱया भक्तांना चांगल्या प्रकारची सुविधा एस. टी. महामंडळाकडून देण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली असल्याचे डी. सी. रमाकांत गायकवाड यांनी आढावा बैठकीत बोलताना सांगीतले. राज्यातून विविध आगाराचे आलेले वाहतूक निरीक्षक, सुपरवायझर यांना यावेळी वारी सुरळीत पार पडावी यासाठी विविध सूचना देण्यात आल्या.

जर कोणत्याही प्रकारची अडचण, अपघात झाल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी विभागीय वाहतूक नियत्रक व पंढरपूर आगार व्यवस्थापक यांना संपर्क करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. वारिसाठी राज्यभरातून आलेल्या वाहक, चालक, सुपरवायझर, वाहतूक निरिक्षक, सहाय्यक निरिक्षक, यांचा व्हॉट्स ऍप ग्रुप तयार करण्यात आला आहे. जर कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास या ग्रुपच्या माध्यातून तात्काळ मदत करता येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगीतले. तसेच एस. टी. कर्मचाऱयांच्या सुरक्षिततेच्या संबंधीतही सूचना यावेळी देण्यात आल्या. पंढरपूर येथे आलेल्या एसटीची पूर्णपणे टेक्निकल स्टाफकडून पूर्णपणे गाडी सुव्यवस्थित आहे का? ते तपासले जाणार आहे. जर एखाद्या एसटी चा काही कारणास्तव बिघाड झाला तर ही टेक्निकल टीम तात्काळ त्याठिकाणी दाखल होणार आहे.

सोलापूर आगाराच्या एकूण 134 गाडय़ा तर राज्यभरातून परिवहन मंडळाच्या  एकूण 1500 गाडय़ांचा ताफा कार्तिकी वारीसाठी आपली सेवा बजावणार आहे.

यासाठी सध्या राज्यांच्या मुंबई , पुणे , सातारा , सिंधुदुर्ग , रत्नागिरी , पालघर , ठाणे , लातूर , बीड , नांदेड आणि परभणी अशा विविध विभागातील बसेस या चंद्रभागा बसस्थानकांमधे थांबणार आहेत. तर सांगली आणि कोल्हापूर येथील बसेस चंद्रभागा बसस्थानकांवर असणार आहेत. मात्र, यांची प्रवाशांची चढ -उतार हा जुन्या बसस्थानकांवरून होणार आहे.

यंदाच्या वारीसाठी एसटी प्रशासनाकडून ऍडव्हान्स बुकिंग,ग्रुप बुकिंगची व्यवस्था ही नवीन बसस्थानकांवर करण्यात आलेली आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता. दररोज जादांच्या दर्शन बसची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आरक्षण खिडकीवर आवडेल तेथे प्रवासाचे चार ते सात दिवसापर्यंतचे पासेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत.  गतवर्षी मोठय़ा प्रमाणावर कार्तिकीमध्ये एसटीला फ्ढायदा झालेला होता. त्याच पार्श्वभूमीवर यंदा देखील उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज असलेले दिसून येत आहे.

Related posts: