|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मंत्र्यांच्या गाडय़ा आडवणाऱया आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

मंत्र्यांच्या गाडय़ा आडवणाऱया आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल 

प्रतिनिधी/ सातारा

नियोजन समितीच्या सभेला येणाऱया राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर आणि पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या गाडय़ा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अडवणाऱया राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा शहर पोलिसांत 20 कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा व जमावबंदीचा आदेशाचा भंग केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.

सातारा शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जिल्हाधिकाऱयांनी जमावबंदीचा आदेश लागू केला असताना तसेच नियोजन समितीच्या सभेला मंत्री येत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, गैस सय्यद, निवास शिंदे, सुनील झंवर, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, राजू गोरे, ओंकार, इदाटे यांच्यासह आणखी दहा जणांनी तो मोडून व मंत्र्यांच्या गाडय़ा अडवून शासकीय कामात अडथळा आणला. त्यावरुन त्यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार केळघणे तपास करत आहेत.