|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा लघुपट महोत्सवात ‘ब्लर्ड लाईन्स’ सर्वोत्कृष्ठ

गोवा लघुपट महोत्सवात ‘ब्लर्ड लाईन्स’ सर्वोत्कृष्ठ 

प्रतिनिधी/ पणजी

चौथ्या गोवा लघुपट महोत्सवात जुही राजवानी आणि वेदांश श्रीवास्तव दिग्दर्शित ‘ब्लर्ड लाईन्स’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक पटकाविले तर शुभंकर एकबोटे यांना ‘टू कप्स ऑफ टी’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. याच लघुपटाला सर्वोत्कृष्ठ लघुपटाचे दुसरे पारितोषिक आणि सर्वोत्कृष्ट पोस्टर डिझाईनचे पारितोषिक मिळाले.

 मराठी चित्रपट परिवार, अदित्य प्रॉडक्शन्स आणि ए. के. फिल्म्सतर्फे आयोजित या महोत्सवाचे गोवा स्टेट लायब्ररी येथे आयोजन करण्यात आले होते. गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक रमेश वेळुस्कर, विल्सन वल्ड ऍकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक उदय ममाणे, निर्माते अदित्य दाढे, अनिल काकडे, संयोजक पद्माकर नष्टे, योगेश बारस्कर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. देन दिवसीय या महोत्वात विविध देशातील शंभरहून अधिक लघुपट दाखविण्यात आले. यापैकी सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात आली. किशोर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

 दिग्दर्शनाचे दुसरे पारितोषिक जुही राजवानी आणि वेदांश श्रीवास्तव यांनी ‘ब्लर्ड लाईन्स’ लघुपटासाठी पटाकविले. तर अनुभूती या लघुपटासाठी निहार सप्रे यांना सर्वोत्कृष्ठ पटकथा लेखनाचे पारितोषिक मिळाले. याच लघुपटासाठी शिवागणेश भालेकर यांना सर्वोत्कृष्ठ संकलनाचे पारितोषिक मिळाले. तांत्रिक विभागामध्ये ‘गोंदणे विठुरायाचे’ या लघुपटासाठी चिन्मय भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ठ कॅमेरामनचे पारितोषिक मिळाले. याच लघुपटासाठी शिवागणेश भालेकर यांना सर्वोत्कृष्ठ संकलनाचे पारितोषिक मिळाले. तांत्रिक विभागामध्ये ‘गोंदण विठुरायाचे’ या लघुपटासाठी चिन्मय भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपट ठरला तर जगदीश तडाखे यांना दि फॉच्युन या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ठ संकल्पनेचे पारितोषिक मिळाले. योगेश बारस्कर यांनी प्रास्ताविक केले.

पारितोषिक : – सर्वोत्कृष्ट लघुपट – ब्लर्ड लाईन्स (सिम्बायोसिस इन्स्टिटूट ऑफ मास कम्युनिकेशन), दिग्दर्शक – शुभंकर एकबोटे (टू कप्स ऑफ टी), टू कप्स ऑफ टि (एकबोटे प्रॉडक्शन्स) व जुही राजवानी आणि वेदांश श्रीवास्तव (ब्लर्ड लाईन्स), ऍनिमेशनपट – रॅबी ऍन्ड टॉच्यु (दिग्दर्शन हृषीकेश जाधव), कॅमेरामन – गोंदण विठुरायाचे (चिन्मय भारद्वाज), पटकथा – अनुभूती (निहार सप्रे), संकलन – अनुभूती (शिवागणेश भालेकर), संकल्पना – फॉर्च्युन (जगदीश तडाखे), पोस्टर डिझाईन – टू कप्स ऑफ टी (अजिंक्य माने).