|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » सिक्युअर क्रेडेन्शिअलचा आयपीओ बुधवारपासून बाजारात

सिक्युअर क्रेडेन्शिअलचा आयपीओ बुधवारपासून बाजारात 

मुंबइ :

 सिक्युअर क्रेन्डेन्शिअल लिमिटेड या कंपनीकडून 1 नोव्हेंबरपासून प्राथमिक समभाग विक्री करण्यात येणार आहे. कंपनी 3,007.35 लाख रुपयांचे भांडवल उभारण्यासाठी 14.67 लाख समभागांची विक्री करण्यात येईल. कंपनीचे समभागाचे दर्शनी मूल्य 10 रुपये निर्धारित केले असून आयपीओचा इश्यू किंमत 205 रुपये आहे. उद्योग क्षेत्रामध्ये कंपनीकडून एम्प्लायी बॅकग्राऊन्ड स्क्रिनिंग सुविधा पुरविण्याचे काम करण्यात येते आणि कंपनीचा विस्तार भारताव्यतिरिक्त अमेरिका, ग्रेट ब्रिटन, फिलीपाईन्स आणि श्रीलंका या देशात पसरला आहे. आपल्या देशात कर्मचाऱयांची पार्श्वभूमी तपासण्याची सुविधा देणाऱया निवडक कंपन्यांपैकी ती एक आहे.

मुंबईमध्ये मुख्यालय असणारी ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून अतिरिक्त खेळत्या भांडवलाची उभारणी, व्यवसायाचा विस्तार, सिम्फनी 3.0 सॉफ्टवेअरची खरेदी, मार्केटिंग, ब्रॅन्ड बिल्डिंग यासाठी निधी वापरणार आहे. कंपनीच्या आयपीओची विक्री 03 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील. कंपनीचा समभाग एनएसईमध्ये सूचीबद्ध होईल.

Related posts: