|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » सलग चौथ्या सत्राच्या तेजीने विक्रमी पातळीवर

सलग चौथ्या सत्राच्या तेजीने विक्रमी पातळीवर 

बीएसईचा सेन्सेक्स 109, एनएसईचा निफ्टी 41 अंशाने वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई

बाजारात सप्ताहाच्या प्रारंभीच चांगलीच तेजी आली होती. सलग चौथ्या सत्रात बाजार विक्रमी पातळीवर पोहोचला असून निफ्टी पहिल्यांदाच 10,350 च्या वर बंद झाला. सरकारी बँक समभागात तेजी कायम राहिल्याने बँक निफ्टी 25,000 च्या वर बंद झाला. सेन्सेक्स 33,340 या विक्रमी तर निफ्टी 10,384 या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे. दिवसअखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर बंद झाला.

बीएसईचा सेन्सेक्स 109 अंशाने वधारत 33,266 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 41 अंशाच्या तेजीने 10,364 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.25 टक्क्यांनी वधारला.

बँकिंग, वाहन, औषध, रिअल्टी, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू समभागात जोरदार खरेदी झाली. बँक निफ्टी 0.6 टक्क्याने वधारत 24,988 वर स्थिरावला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 1.25 टक्के, वाहन निर्देशांक 1 टक्का आणि औषध निर्देशांक 1.1 टक्क्यांनी मजबूत झाला.

बीएसई रिअल्टी निर्देशांक 2 टक्के, भांडवली वस्तू निर्देशांक 1 टक्का, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 2.4 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 1.1 टक्क्यांनी मजबूत झाला. एफएमसीजी, आयटी आणि धातू समभगात दबाव आला होता. निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक 0.7 टक्क्यांनी घसरला.

दिग्गज समभागांची कामगिरी

भारती इन्फ्रा, येस बँक, ल्यूपिन, टेक महिंद्रा, डॉ. रेड्डीज लॅब, टाटा मोटर्स डीव्हीआर, ओएनजीसी, भारती एअरटेल 2.7-1.6 टक्क्यांनी वधारला. एचसीएल टेक, हिंदुस्थान युनि, आयटीसी, विप्रो, टाटा स्टील, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 2.2-0.8 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात इंडियन बँक, युनायटेड ब्रुअरीज, मॅक्स फायनान्शियल, आयडीबीआय बँक, युनियन बँक 5.6-4.7 टक्क्यांनी वधारले. वॉकहार्ट, बर्जर पेन्ट्स, आयडीएफसी बँक, सन टीव्ही, बजाज फिनसर्व्ह 2.4-1.25 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात बीएल कश्यप, एचबीएल पॉवर, जेन टेक, सन फार्मा ऍडव्हान्स रिसर्च, रुशील डेकोर 20-11.7 टक्क्यांनी मजबूत झाले. ज्युबिलन्ट इन्डस्ट्रीज, डीआयसी इंडिया, भूषण स्टील, आयएनईओएस स्टायरो, गुजरात बोरोसिल 6.8-5 टक्क्यांनी घसरले.

Related posts: