|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » वीरभद्र यांचे पूर्ण कुटुंबच भ्रष्टाचारात लिप्त !

वीरभद्र यांचे पूर्ण कुटुंबच भ्रष्टाचारात लिप्त ! 

भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा हल्लाबोल : हिमाचलमध्ये माफियाराज चालल्याचा आरोप

शिमला

: भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी हिमाचल प्रदेशातील प्रचाराला प्रारंभ करत काँग्रेसच्या सरकारविरोधात जोरदार हल्ला चढविला. मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचा हल्ला शाह यांनी हलहौजी येथील सभेत चढविला. काँग्रेसच्या सत्ताकाळात राज्यात माफियाराज चालल्याचा दावाही त्यांनी केला. राज्याचा विकास करण्यात काँग्रेस सरकार सपशेल अपयशी ठरले. हिमाचलमध्ये भूमिपूजनाचे अनेक कार्यक्रम झाले, परंतु उद्घाटन एकाचे देखील झाले नाही. वीरभद्रांनी राज्याला कर्जाच्या खाईत लोटल्याचा आरोप शाह यांनी केला.

विकासासाठी कर्ज घेणे वाईट बाब नाही, परंतु  पैसा हडप करणे गैर आहे. केंद्रात भाजपचे सरकार 3 वर्षांपासून काम करत आहे. आमचे विरोधक आमच्यावर भ्रष्टाचाराचा एक देखील आरोप लावू शकले नाहीत असा दावा भाजपअध्यक्षांनी केला.

पुढील 5 वर्षांसाठी सरकार कोणाचे आणायचे हा निर्णय जनतेनेच घ्यावा असे शाह म्हणाले.

स्वातंत्र्याच्या घोषणा देणाऱयांना काँग्रेसचे समर्थन

काँग्रेस काश्मिरात स्वातंत्र्याच्या घोषणा देणाऱयांना समर्थन देते, हिमाचलच्या लोकांना हे मान्य आहे का? मोदी सरकारने राज्यातील 70 मार्गांना राष्ट्रीय महामार्गात बदलले. मोदी सरकारने हिमाचलमध्ये महामार्ग, शौचालय आणि रेल्वेसंपर्क सुविधा देत सर्वप्रकाराने विकास निर्धारित केला. भाजप राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात देशाच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान केलेल्या सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ उद्यान आणि स्मारके उभारणार असल्याचे शाह यांनी सांगितले.

Related posts: