|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बेरोजगार पदवीधारकांची समस्या ऐरणीवर

बेरोजगार पदवीधारकांची समस्या ऐरणीवर 

लांजा /  वार्ताहर

पदवीधर मतदार संघासाठी सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव मतदारांच्या नोंदणीसाठी सरसावले असुन, तालुक्यातील पदवीधारकांच्या घरोघरी जाऊन नोंदणी केली जात आहे. या निवडणुकीमुळे पदवीधर मतदार कधी नव्हे ते प्रकाशझोतात आले असुन ही संधी साधुन ते आपल्या समस्या मांडु लागले आहेत. बेरोजगार पदवीधारकांची समस्येने तिव्र रुप धारण केले असताना आतापर्यंत त्यासाठी काय? केले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तालुक्यात पदवीधारकांची सख्या लक्षणीय आहे. दरवर्षी पदवीधरकांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. ही एक आशादायक बाब असली तरी याला ही दुसरी एक काळी बाजु आहे. निव्वळ पदवीधारक वाढत असले तरी याबरोबरच बेरोजगारीचे प्रमाण ही झपाटय़ाने वाढले आहे. तालुक्याचा विचार करता पदवीधरांची संख्या लक्षणीय आहे. परंतु यातील बहुतांश पदवीधर एकतर बेरोजगार आहेत. अन्यथा छोटा मोठा काम धंदा करुन उदरनिर्वाह करत आहेत. नुकतेच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असुन अनेक ईच्छुक उमेदवारांची नावे समोर येत आहेत. कधी नव्हे ती शिवसेना ही या निवडणुकीत आपला उमेदवार देणार असल्याची माहीती समोर आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असुन कार्यकर्ते 2014 आधीच्या पदवीधारकांच्या घरोघरी जाऊन नवीन मतदारांची नोंदणी करत आहेत. या निवडणुकीमुळे कधी नव्हे ते पदवीधर प्रकाश झोतात आले आहेत. त्यामुळे ते आपल्या व्यथा व समस्या मांडु लागले आहेत.

दरम्यान, नव्याने नोंदणी करण्यात येणारे बहुतांश पदवीधर हे बेरोजगार असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या कडुन बेरोजगारीचाया समस्ये विषयी प्रामुख्याने बोलले जाऊ लागले आहे. नुसती पदवी प्राप्त करुन काय होते, बेरोजगार पदवीधारकांसाठी आतापर्यंत काय केले गेले यासारखे प्रश्न उपस्थित केले जात आहे. या निवडणुकीत बेरोजगार पदवीधारकांची समस्या ही हा प्रमुख मुद्दा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. 

Related posts: