|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » काळ्य़ादिनी हरताळ पाळून व्यवहार बंद ठेवा

काळ्य़ादिनी हरताळ पाळून व्यवहार बंद ठेवा 

वार्ताहर/ मंगसुळी

 येथील महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ काळादिन म्हणून कडकडीत हरताळ पाळून सर्व व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन येथील मराठा मंदिरात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे. तसेच निपाणी शिवसेनेही बैठक घेऊन काळादिन कडकडीत पाळण्याचे आवाहन केले. यावेळी बैठकीला मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

गेली 61 वर्षे सातत्याने लढा देत सीमाभागातील मराठी भाषिक जनता यातना भोगत आहे. धगधगत्या भावनांना उभारी देऊन वाट मोकळी करून देण्यासाठी 1 नोव्हेंबर काळादिन कडकडीत हरताळ पाळण्यात येतो. तो दिवस म्हणजे सीमालढय़ातील योगदान दिलेल्या क्रांतीवीरांचे स्मरण होय. भाषावार प्रांतरचनेमुळे मराठी भाषिकांवर अन्याय करून मराठी भाषिक सीमाभाग कर्नाटकात डांबण्यात आला. त्याचा उदेक म्हणून 1 नोव्हेंबर हा काळादिन पाळण्याची प्रथा अवलंबण्यात आली.

 भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात अनेक जाती-धर्माचे, पंथांचे, अनेक भाषांचे लोक वास्तव्यास आहेत. प्रत्येक राज्यात विविध जातीचे, भाषेचे लोक राहतात. प्रत्येकाला आपली मायबोली आपलीशी वाटते. प्रत्येक राज्यात वेगवेगळी भाषा बोलली जाते. प्रत्येकाला जरी आपल्या राज्याचा अगर भाषेचा अभिमान असल्यास दुसऱया भाषेचा तिरस्कार, निंदा करणे हे घटनाबाह्य आहे. लोकशाही राष्ट्रात प्रत्येक भाषेला व प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आहे. याची जाण हवी. आज कित्येक भारतीय नागरिक परदेशात वास्तव्यास आहेत. तेथे त्यांनी नागरिकत्व मिळवून शासनदरबारी जाण्याची मुहूर्तमेढ रोवून कित्येकजण आज शासनदरबारी अभिमानाने मान उंचावून आम्ही भारतीय आहोत. याची जाणीव करून देतात. तेथे मात्र भाषा अगर देशाचा विचार न करता सनदशीर मार्गाची वागणूक मिळते, हे म्हणावे लागेल.

 आपल्या राज्यात मात्र भाषाद्रोहाचा कलंक दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्याची भाषा कन्नड समजून कन्नड भाषेचा मराठी मनावर, मराठी भाषेवर वरवंटा फिरवण्यात धन्यता मानत आहे. बेळगाव, विजापूर, गुलबर्गा आदी जिह्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत बोलीभाषा, लिखाण, कागदोपत्रे मराठीतच आहेत. केवळ आपलीच भाषा श्रेष्ठ म्हणणाऱया शासनाने आपले धोरण बदलावे. दबाव तंत्र वापरल्यामुळे देशातील 165 मातृभाषा लोप पावण्याच्या मार्गावर आहेत.

कन्नड सक्तीच्या वरवंटय़ामुळे मराठी अक्षर पुसली जात आहेत. साधे दुकानावरील बोर्डसुद्धा कन्नड हवेत म्हणून नियमावली आचरणात आणली जात आहे. सर्वत्र कन्नड लिपीचा बाजार सुरु असला तरी मराठी माणसाच्या अंतःकरणातील भाषा कोण हिरावून घेणार हा यक्षप्रश्न आहे. आज देशात संरक्षण खात्यात मराठा बटालियन (मराठा रोजेमेंट) या नावाने प्रचलित आहे. सर्वांनाच ज्ञान आहे. म्हणून मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तमाम सीमाभागातील मराठी जनता काळादिन म्हणून पाळतात. सीमाप्रश्न हा न्याप्रविष्ठ असल्याने सध्या यावर भाष्य करणे म्हणजे अपेक्षा व्यक्त करणे होय.

1 नोव्हेंबर काळादिन कडकडीत पाळा : निपाणी शिवसेनेचे आवाहन

निपाणी : 1956 पासून सीमाभागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी गेली 60 वर्षे धडपडत आहे. कर्नाटकात 20 लाख मराठी भाषिकांना कर्नाटकात डांबण्यात आले आहे. त्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी, रिक्षा असोसिएशनने बंदमध्ये सहभागी होऊन 1 नोव्हेंबर काळादिन कडकडीत पाळावा, असे आवाहन शहर शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी कोल्हापूर जिह्यातील शिवसेनेचे आमदार सत्यजीत पाटील सरुडकर, जि. पं. सदस्य हंबीरराव पाटील, सीमाभागाचे गाढे अभ्यासक प्रा. अच्युत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मराठी भाषिकांनी 1 रोजी सकाळी 10 वाजता धर्मवीर संभाजी चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना बाबासाहेब खांबे, शहर प्रमुख विशाल हत्तरगी, दिलावर गडकरी, हरीष तारळे, रमेश निकम, किरण पावले, पप्पू सूर्यवंशी, सतीश यादव, शरद बुडके, शंकर मुत्नाळे, शितल कासार, सुरज पोटले, बाळासाहेब सावरकर, अविनाश शिंदे, रवी बागल, अशोक हावल, रमेश कावळे, प्रताप पाटील, मल्लू निकम