|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » पटेलांच्या राष्ट्रनिर्माणाच्या वारशाकडे मागील सरकारचे दुर्लक्ष : मोदींचा काँग्रेसवर हल्ला

पटेलांच्या राष्ट्रनिर्माणाच्या वारशाकडे मागील सरकारचे दुर्लक्ष : मोदींचा काँग्रेसवर हल्ला 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या वारशाकडे मागील सरकारने दुर्लक्ष केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 142व्या जयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.

‘सरदार पटेल’ यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत आहे. त्यांनी देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचा देशाला अभिमान आहे.मात्र पटेल यांचे योगदान लोकांनी विसारावे, यासाठी काहींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. तरीही देशातील तरूणांच्या मनात सरदार पटेल यांच्याविषयी अतिशय आदराची भावना आहे. देश एकसंबंध ठेवण्यात सरदार पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळेच देशातील तरूणाई त्यांच्याकडे आदराने पाहते, असे मोदींनी म्हटले.

 

Related posts: