|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » leadingnews » ‘मेक इन इंडिया’ ही ‘फेक इन इंडिया’ ; अशोक चव्हाणांची टीका

‘मेक इन इंडिया’ ही ‘फेक इन इंडिया’ ; अशोक चव्हाणांची टीका 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

सरकारने सुरु केलेली ‘मेक इन इंडिया’ची योजना ही ‘फेक इन इंडिया’ असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली. तसेच राज्य सरकारचा कारभार निजामाच्या राजवटीपलीकडचा असल्याचेही चव्हाण म्हणाले.

औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘मेक इन इंडिया’ नाहीतर ही ‘फेक इन इंडिया’ योजना आहे. कर्जदार राज्याच्या यादीत महाराष्ट्र सरकार अव्वल स्थानी येईल, अशी स्थिती सरकारने निर्माण केली आहे. तसेच सिंचनाच्या प्रश्नाला केंदबिंदू करत भाजप सत्तेवर आली आहे. सिंचन क्षेत्राची चौकशी सुरु आहे. त्याला आमचा विरोध नाही. मात्र, या मुद्याचा राजकीय सौदेबाजीसाठी उपयोग केला जात असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. त्यामुळे सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही चव्हाणांनी केली.