|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » टाटा-डोकोमो वाद संपुष्टात

टाटा-डोकोमो वाद संपुष्टात 

टाटाकडून डोकोमोला 8,259 कोटी रुपये

वृत्तसंस्था/ मुंबई

दीर्घ काळापासून जपानची एनटीटी डोकोमो आणि भारतातील टाटा समूह यांच्यातील वाद मंगळवारी संपुष्टात आला. टाटा समुहाकडून जपानी कंपनीला 8,259 कोटी रुपये देण्यात आले. डोकोमोकडे असणारे सर्व समभाग टाटा टेलिसर्व्हिसेसने टाटा समुहाकडे हस्तांतरित केल्याचे डोकोमोकडून सांगण्यात आले. कर्जात असणाऱया टाटा टेलिसर्व्हिसेस आणि एनटीटी डोकोमो यांच्यात एप्रिल 2014 पासून वाद सुरू होता. डोकोमोने आपल्याकडील संपूर्ण 26.5 टक्के समभाग टाटा टेलिसर्व्हिसेसला देत भारतातील दूरसंचार क्षेत्रातून पाय मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.

तीन वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर एप्रिलमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने टाटा समुहाला एनटीटी डोकोमोला 1.17 अब्ज डॉलर्स देण्यास परवानगी दिली होती. न्यायालयाने दोन्ही कंपन्यांची भागीदारी संपुष्टात आणण्यास मंजूरी दिली होती. आर्थिक आव्हाने आणि टाटा टेलिसर्व्हिसेसमधील व्यवसाय बदलामुळे डोकोमोने भारतातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. टाटाने गेल्या महिन्यात आपला मोबाईल व्यवसाय भारती एअरटेलला विक्री करण्याचा निर्णय घेतला.

टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांनी टाटा समूह आणि कंपनीच्या भागीदारांसाठी योग्य ते समाधान काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे पदभार स्वीकारल्यानंतर म्हटले होते. आता भारती एअरटेलला 1800, 2100 आणि 850 मेगाहर्ट्ज क्षमतेचे बॅन्ड देण्याचा मार्ग मोकळा झाला असून एअरटेलकडील स्पेक्ट्रमचा आकार 178.5 मेगाहर्ट्जने वाढेल.

 आता टाटाकडील 4 कोटी ग्राहक भारती एअरटेलला मिळतील. मात्र यासाठी संचालक मंडळाच्या परवानगीची आवश्यकता 

Related posts: