|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखपदी राजन ?

फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखपदी राजन ? 

वॉशिंग्टन :

 आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची नियुक्ती अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी करण्याची शक्यता वर्तविण्यात आली. अमेरिकेच्या या मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख असणाऱया जेनेट येलेन या कार्यकाळ नवीन वर्षाच्या सुरुवातीला संपणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लवकरच नवीन प्रमुखाच्या नावाची घोषणा करतील.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील अर्थ क्षेत्रातील नियतकालीक बॅरोन्समध्ये लिहिण्यात आलेल्या लेखात राजन यांच्या नावाची शिफारस करत प्रशंसा करण्यात आली. राजन यांच्या कार्यकाळात भारतातील महागाईत घसरण, चलन स्थिरता, सूचीबद्ध कंपन्यांच्या समभागात 50 टक्क्यांची वृद्धी झाली होती. याव्यतिरिक्त त्यांनी काही वर्षे अगोदरच आर्थिक मंदीचा इशारा दिला होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा अमेरिकेतील क्रीडा संघात समावेश करण्यात येत असल्याने मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखपदी जागतिक पातळीवरील व आर्थिक क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तीची निवड का करण्यात येऊ नये, असे लेखात म्हणण्यात आले आहे. यापूर्वी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठीच्या संभाव्य यादीत रघुराम राजन यांचा समावेश होता.