|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » सहामाहीत वित्तीय तूट 91 टक्क्यांवर

सहामाहीत वित्तीय तूट 91 टक्क्यांवर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरकारी खर्चात वाढ झाल्याने पहिल्या सहामाहीत वित्तीय तूट 91.3 टक्क्यांवर पोहोचली आहे. आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात खर्च आणि उत्पन्न यांच्यातील फरक 4.99 लाख कोटी रुपयांचा होता, असे महालेखापालच्या आकडेवारीतून समोर आले. गेल्या वर्षी याच कालावधीत वित्तीय तूट 83.9 टक्के होती.

चालू आर्थिक वर्षात ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत वित्तीय तूट 3.2 टक्क्यांपर्यंत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी ती 3.5 टक्के आणण्यात यश आले होते. पहिल्या सहामाहीत सरकारकडे 6.23 लाख कोटी रुपयांचे महसूल गोळा झाला आहे. सरकारच्या अर्थसंकल्पीय आकडेवारीच्या तुलनेत हा 41.1 टक्के आहे. चालू आर्थिक वर्षात 15.15 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न गोळा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारच्या खर्चात वाढ होत अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 11.49 लाख कोटी रुपयांसह 53.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबरपर्यंत भांडवली खर्च तरतुदीपैकी 47.3 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत तो 54.7 टक्के होता.