|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » एअरटेलच्या सप्टेंबर तिमाही नफ्यात 75 टक्के घट

एअरटेलच्या सप्टेंबर तिमाही नफ्यात 75 टक्के घट 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारती एअरटेलने मंगळवारी सप्टेंबर तिमाहीचा निकाल प्रसिद्ध केला. कंपनीच्या नफ्यात गेल्या वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत यावेळी 76 टक्क्यांनी घट झाली. गेल्या तिमाहीत कंपनीला 343 कोटी रुपयांचा नफा झाला. गेल्या वर्षी समान कालावधीत हा नफा 1,461 कोटी रुपयांचा होता. जून तिमाहीत कंपनीला 367 कोटी रुपयांचा नफा होता.

दुसऱया तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 104 टक्क्यांनी घटत 21,777 कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या आर्थिक वर्षाच्या या तिमाहीत कंपनीला 24,650 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होती. कंपनीचा देशातील व्यवसायातून मिळणारे उत्पन्न 13 टक्क्यांनी घसरले. आफ्रिकेतील व्यवसायाने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली आहे. आफ्रिकेतील उत्पन्न 2.8 टक्क्यांनी वाढले. कंपनीला प्रति ग्राहक मिळणारे उत्पन्न 154 रुपयांवरून 145 वर पोहोचले. या कालावधीत ग्राहक संख्येत 7.7 टक्क्यांनी वाढ झाली.