|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » 2009 नंतर प्रथमच आखाताला फटका

2009 नंतर प्रथमच आखाताला फटका 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल  अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान,  विकास दरात घसरण

वृत्तसंस्था/ दुबई

खनिज तेलाने समृद्ध असलेल्या आखाती देशांना अनेक क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज आहे. सध्या तेलाच्या किमती घसरल्याने 2009 नंतर प्रथम तेथील देशांची अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले. खनिज तेलाच्या किमती मोठय़ा प्रमाणात घसरल्याने त्याचा फटका या देशांना बसला आहे.

बहारिन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात या देशांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारी खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला. तेलाव्यतिरिक्त अन्य मार्गातून उत्पन्न वाढविण्यासाठी ते देश प्रयत्नशील आहे. या सहा देशांव्यतिरिक्त प्रदेशातील अन्य देशांची अर्थसंकल्पीय तूट वाढत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ‘रिजनल इकोमॉमिक आऊटलूक’ प्रसिद्ध केला असून आखाती देशांचा विकास दर 0.5 टक्क्यांवर घसरेल अशी शक्यता वर्तविली आहे. 2009 मध्ये ती 0.3 टक्क्यांपर्यंत घसरली होती.

आखाती देशांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी इतरस्त्र गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यावे. खासगी क्षेत्राला प्रोत्साहन मिळाल्याने विकास दरात वाढ आणि अतिरिक्त रोजगारनिर्मितीस मदत होईल. तेलाच्या किमती घसरल्यानंतर उत्पादन घटविण्याचा ओपेकने निर्णय घेतला असून त्यामुळे काही प्रमाणात अर्थव्यवस्था सावरण्यास मदत झाली आहे, असे आयएमएफचे संचालक जिहाद अझूर यांनी म्हटले.

इराण, इराक, अल्जेरिया, लीबिया, येमेन यांच्यासह मध्य पूर्व आणि उत्तर आप्रेकेचा यंदा विकास दर केवळ 1.7 टक्क्यांवर पोहोचेल असे अहवालात म्हणण्यात आले. गेल्या वर्षी विकास दर 5.6 टक्के होता.

या उलट मेना संघटनेतील तेल आयात करणाऱया देशांचा विस्तार 2016 च्या 3.6 टक्क्यांवरून 4.3 टक्क्यांपर्यंत वधारेल असे म्हणण्यात आले.  

Related posts: