|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » सलग चार सत्रांच्या तेजीला बेक

सलग चार सत्रांच्या तेजीला बेक 

बीएसईचा सेन्सेक्स 53, एनएसईचा निफ्टी 28 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

सलग चार सत्रात तेजी आल्यानंतर मंगळवारी बाजारात सुस्ती आली होती, आणि दिवसअखेरीस बाजार घसरत बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दिवसभर मर्यादित प्रमाणात व्यवहार होत असल्याचे दिसून आले. निफ्टी 10,324 आणि सेन्सेक्स 33,175 पर्यंत घसरला होता. निफ्टी 10,350 च्या खाली बंद झाला.

बीएसईचा सेन्सेक्स 53 अंशाच्या घसरणीने 33,213 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 28 अंशाच्या कमजोरीने 10,335 वर स्थिरावला.

मिडकॅप समभागातही सुस्ती होती, मात्र स्मॉलकॅप समभागात काही प्रमाणात खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.15 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.1 टक्क्यांच्या किरकोळ तेजीने बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी मजबूत झाला.

पीएसयू बँक, धातू, वाहन आणि भांडवली वस्तू समभागांनी बाजारात दबावाचे काम केले. बँक निफ्टी 0.1 टक्क्यांनी मजबूत होत 15,019 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 2.1 टक्के, धातू निर्देशांक 1.7 टक्के आणि वाहन निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरला. खासगी बँक, रिअल्टी, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू समभागात खरेदी झाली.

दिग्गज समभागांची कामगिरी

ऍक्सिस बँक, भारती इन्फ्रा, ओएनजीसी, भेल, एचसीएल टेक, बीपीसीएल, भारती एअरटेल, हीरो मोटो 8-0.6 टक्क्यांनी वधारले. यूपीएल, वेदान्ता, इन्फोसिस, गेल, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, टाटा स्टील, एसबीआय, टाटा मोटर्स 3-1.7 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात बीईएल, एमआरपीएल, नाल्को, टाटा कम्युनिकेशन्स, ओबेरॉय रिअल्टी 5.3-3.6 टक्क्यांनी मजबूत झाले. यूनियन बँक, आयडीबीआय बँक, एलआयसी हाऊसिंग, इंडियन बँक, सेल 3.8-2.6 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात 8के माईल्स, बालाजी अमाइंन्स, इंडिया ग्लायकोल्स, किरी इन्डस्ट्रीज, सेंट गोबिन 16.3-13 टक्क्यांनी वधारले. भूषण स्टील, तानला सोल्युशन्स, ऑरिकॉन एन्टरप्रायजेस, एलजी बालकृष्णन, ऑनमोबाईल ग्लोबल 11.2-6.2 टक्क्यांनी घसरले.

 

Related posts: