|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शॉर्टसर्किटमुळे विजयमाला, महादेव ऑटोलूमला आग

शॉर्टसर्किटमुळे विजयमाला, महादेव ऑटोलूमला आग 

वार्ताहर/ कबनूर

येथील साखर कारखाना रस्त्यावरील विजयमाला टेक्सस्टाईल्स व महादेव टेक्सस्टाईल्स या ऍटोलूम कारखान्यांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत सुमारे तीन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. याची फिर्याद शिवाजीनगर पोलिसांत मालक प्रमोद पाटील यांनी दिली.

कबनूर (ता. हातकणंगले) येथे पंचायत समितीचे माजी सदस्य प्रमोद पाटील तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब पाटील यांच्या मालकीच्या विजयमाला व महादेव टेक्सस्टाईल्स ऍटोलूम कारखाना आहे. मंगळवारी  पहाटे 6.30 च्या सुमारास येथील एका ऍटोलूमला शॉर्टसर्किटने आग लागली. ही  आग सर्वत्र पसरली. आग विझविण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी अडीच तासानंतर आग आटोक्मयात आणली. आगीत दोन्ही कारखान्यांतील वीस ऍटोलूम, वीस बीम, कापडाचे रोल, एअर डक्ट, इलेक्ट्रीकल साहित्य व छत जळून खाक झाले.

Related posts: