|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रसचा मोर्चा ; काँग्रेस – मनसे कार्यकर्ते भिडले

फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रसचा मोर्चा ; काँग्रेस – मनसे कार्यकर्ते भिडले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ दादरमध्ये काँग्रेसने मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान मनसे आणि काँग्रेसचे कार्यकर्त्ते आपापसात भिडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेपकरत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ आज सकाळी दादरमध्ये मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु यावेळी मनसे कार्यकर्ते तिथे दाखल झाले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर बटाटे फेकून विरोध केला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे काँग्रेसचा मोर्चा होऊ शकला नाही.

 

Related posts: