|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सिनेस्टाईल लुटले ‘बॅंक ऑफ्ढ महाराष्ट्र’चे सत्तर लाख

सिनेस्टाईल लुटले ‘बॅंक ऑफ्ढ महाराष्ट्र’चे सत्तर लाख 

Fपंढरपूर / प्रतिनिधी

एखादा अधिकारी वाहनामधून रोकड घेवून जातो. त्यानंतर ठराविक अंतर गेल्यावर अज्ञात वाहनांची धडक होते. संबधित अधिकाऱयांच्या डोळयांत चटणी टाकून त्यांची लूट होते. त्यानंतर चोर पोबारा होतात. अन् हा अधिकारी पोलिसात जातो. ही घटना कुठल्या चित्रपटातील नसून पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे बुधवारी घडली.  

सांगोला येथून पंढरपूरकडे येणारी बँक ऑफ्ढ महाराष्ट्रची सत्तर लाख रूपयांची रोकड काही अज्ञातांनी लुटली. सदरची घटना तालुक्यातील खर्डी येथे घडली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी, बॅंक ऑफ्ढ महाराष्ट्रच्या सांगोला शाखेचे व्यवस्थापक अमोल भोसले आपल्या खासगी कारमधून (एम.एच.45 एन. 5831)  70 लाखांची रोकड घेऊन पंढरपूरकडे येत होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासमवेत एकही सुरक्षा रक्षक नव्हता. त्याच्यासमवेत बॅंकेचे एक नागनाथ शिकरे नामक कर्मचारी उपस्थित होते. भोसले आपल्या वाहनामधून पंढरपूरडे येत असताना, खर्डीजवळ असणाऱया जगताप मळा येथे दबा धरून बसलेल्या बोलेरो गाडीतील चार दरोडेखोरांनी व्यवस्थापक भोसले यांच्या गाडीला मागून धडक दिली. यानंतर भोसले यांनी गाडी थांबवल्यानंतर काच फ्ढाsडून त्यांच्या डोळयात चटणी टाकली आणि गाडीतील सत्तर लाख घेऊन दरोडेखोरांनी पोबोरा केला.

विशेष म्हणजे या प्रकरणानंतर व्यवस्थापक भोसले यांनी तात्काळ खर्डी येथे येऊन पोलिसांना याबाबत सुचित केले. यानंतर पोलिसांनी देखिल त्यांच्या तपासांची चक्रे फ्ढिरवित तपास सुरू केला. जिल्हा पोलिस अधिक्षक विरेश प्रभू तसेच सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळें यांनी घटनास्थाळास भेट दिली. आणि तपासाला गती देण्यचाही प्रयत्न केला. 

या धाडसी चोरीनंतर बंकेची रक्कम खासगी वाहनामधून घेवून जाता येते का ? तसेच जरी ही रक्कम खासगी वाहनामधून घेऊन जात असेल. तरी त्यांच्यासमवेत सुरक्षा रक्षक का नाही ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

सदरचा संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर केवळ सुरक्षा रक्षक नसल्याने या प्रकरणामध्ये शंकेला वाव निर्माण झाला आहे. याबाबत बुधवारी दुपारनंतर उलट सुलट चर्चा देखील सुरू झाली होती. यामध्ये बॅकेमधीलच काही कर्मचारी  दरोडेखोरांशी मिलिभगत असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकारामध्ये शंकेला वाव निर्माण झाला आहे. मात्र याबाबतचे खरं सत्य हे पोलिसांच्या तपासानंतर पुढे येणार आहे.