|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » डीएसकेंच्या पुण्या-मुंबईतील कार्यालयांवर छापे

डीएसकेंच्या पुण्या-मुंबईतील कार्यालयांवर छापे 

पुणे / वार्ताहर :

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच डीएसके कंपनीचे मालक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके व हेमंती दीपक कुलकर्णी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे 351 ठेवीदारांनी तक्रारी दाखल केल्या असून, यामधून अंदाजे 12 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या चार विशेष पथकांनी डीएसकेंच्या पुण्या-मुंबईतील कार्यालयांबरोबरच निवासस्थानांवर एकाचवेळी छापे घालून महत्त्वपूर्ण कागदपत्रे, फाईल्स ताब्यात घेतल्या आहेत.

जितेंद्र नारायण मुळेकर यांच्यासह 41 गुंतवणूकदारांनी तक्रार दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे अधिनियम 1999 कलम 3,4 प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हय़ाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत आहे.पोलिसांनी गुन्हय़ाच्या तपासाकरिता आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. गुन्हयाचा तपास शिघ्रगतीने व्हावा, यासाठी पाच पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, चार सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी व 20 पोलीस कर्मचारी यांचा या पथकात समावेश केला आहे. या पार्श्वभूमीवर चार विशेष पथकांनी डीएसकेंच्या पुण्यामुंबईतील कार्यालयांवर तसेच निवासस्थानी छापे घातले. त्यात महत्त्वाचे कागदपत्रे व हार्डडिस्क, पेनड्राइव्ह, व्यवहारांच्या फाईल्स, दोन गाडय़ा ताब्यात घेतल्या आहेत.

Related posts: