|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News » जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद तर 2 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद तर 2 दहशतवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू – काश्मीरमध्ये एकाच वेळी चार ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामा, साम्बुरा, गाव, अनंतनाग आणि कुपवाडामध्ये दहशतवादी घुसले असून, काही ठिकाणी हल्लेही केले. या हल्ल्यांमध्ये 2 जवान शहीद झाले असून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन जवान शहीद झाले तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला . दहशतवादी कारवाईची दुसरी घटना आनंतनागमध्ये घडली. या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये लष्कराचा एका जवान जखमी झाला. तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. श्रीनगरपासून 17 किलोमीटर अंतरावर असणाऱया पम्पोरमध्येही दहशतवादी घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. त्यामुळे या भागात जवानांकडून शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. याशिवाय कुपवाडामधील एसएसपी ऑफिसजवळ ग्रेनेड सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर सुरक्षारक्षकांकडून ग्रेनेड जप्त केले आहे.