‘ब्ल्यू व्हेल’नंतर आता ‘डार्क नेट’चे जाळे

ऑनलाईन टीम / मुंबई :
जगभरत खळबळ उडवून देणाऱया ‘ब्ल्यू व्हेल’ गेमनंतर आता ‘डार्क नेट’चे जाळे पसरायला सुरुवात झाल्याचे संकेत मिळताना दिसत आहे. हा गेमही ब्ल्यू व्हेल इतकाच धोकादायक असल्याची माहिती पुढे आली असून, मुंबईतील एका 15 वर्षीय मुलाच्या बेपत्ता होण्याने याबाबतची धास्ती वाढली आहे.
मुंबईजवळच्या गोवंडी परिसरात दहावीत शिकणारा 15 वर्षाचा मुलगा घर सोडून गेल्याबाबतची तक्रार त्याच्या पालकांनी गोवंडी पोलिसांत दिली आहे. या मुलाने 29 ऑक्टोबरला घर सोडताना ‘मला शोधू नका, मी मेलो असे समजा’, अशी चिठ्ठी लिहिली आहे. जाताना तो घरातील 15 हजार रूपये घेऊन गेला आहे. हा मुलगा काही दिवसांपासून डार्क नेट गेम खेळत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. हा गेम नक्की कसा आहे, याबाबत अधिक माहिती नसली तरी हा गेमही ब्ल्यू व्हेलसारखाचा धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.