|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » leadingnews » ऊसदराचा तिढा सुटला; एफआरपी अधिक 200 रुपये

ऊसदराचा तिढा सुटला; एफआरपी अधिक 200 रुपये 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

चालू वर्षीच्या ऊस दराचा तिढा कोल्हापूर येथे आज सुटला आहे. यावर्षी गतवर्षीपेक्षा ३५३ रू जादा उचल मिळाली असून एफ. आर. पी. अधिक २०० रू जादा या सुत्रानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्यावर्षी ९.५० टक्के उताऱ्याला २३०० रूपये एफ. आर. पी होती. कृषीमूल्य आयोगाने यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन २५५० केली आहे. गेल्यावर्षी पहिली उचल एफ. आर. पी अधिक २ महिन्यांनतर १७५ असा समजोता झाला होता. या हिशोबाने यावर्षी ३२८रूपयांनी वाढ झालेली आहे.

कोल्हापूर सांगली भागांत सरासरी रिकव्हरी 12.50 टक्के : खा. राजू शेट्टी

कोल्हापूर व सांगली भागांत सरासरी रिकव्हरी 12.50 टक्के असते. या हिशोबाने विचार केला तर मूळ रिकव्हरीत झालेली 250 रू वाढ व वरच्या 1 टक्मयांमध्ये 42 रूपयावरून 68 रूपये झालेली वाढ लक्षात घेता एका टक्क्यापाठीमागे 26 रूपये वाढ झाली म्हणजे 3 टक्क्यांची 78 रूपये वाढ झाली. हा हिशेब लक्षात घेऊन 250+78 अशी 328 होते. गेल्या वषी एफ. आर. पी. + 175 अशी होती म्हणजेच यावषी त्यातही 25 रूपये वाढ झाली अशी एकूण वाढ गेल्या वषीच्या उचलीपेक्षा (328+25) अशी 353 रूपये होते. 12.50 टक्के रिकव्हरी असणाऱया साखर कारखान्याची ऊचल गेल्यावषीपेक्षा असणाऱया दरात 353 रूपये जास्त होते.

 

Related posts: