|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » पनामानंतर पॅराडाईज पेपर्स; काळय़ा पैशांच्या यादीत 714 भारतीयांचा समावेश

पनामानंतर पॅराडाईज पेपर्स; काळय़ा पैशांच्या यादीत 714 भारतीयांचा समावेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पनामा पेपर्सनंतर आता ‘पॅराडाइज पेपर्स’ घोटाळा समोर आला आहे. जगभरातील श्रीमंतांचा काळा पैसा विदेशात पाठविण्यास काही बोगस कंपन्या मदत करत असल्याचे या घोटाळय़ातून समोर आले आहे. पॅराडाईज पेपर्समध्ये 1.34 कोटी कगदपत्रांचा समावेश आहे. भारतासह जगभरातील श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या काळय़ा धनाची माहिती यात देण्यात आली आहे. या यादीत 714 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती उघड झाली आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’सह देशभरातील 90माध्यम संस्थांनी 180 देशांमधून ही कागदपत्र मिळवली आहेत. ‘इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट’ने हे प्रकरण समोर आणले आहे. या पेपर्समध्ये महाराणी एलिजाबेथ , अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांचे काही मंत्र्यांसह जगभरातील अनेक महत्त्वाच्य व्यक्तींची नावे आहेत. भारतातील 714 व्यक्तींची नाव यामध्ये आहेत. या सर्वांनी परदेशातील कंपन्या आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैसा लपवला आहे. अहवालात ज्या 180 देशांचा डेटा देण्यात आला आहे. त्यामध्ये भारत 19 व्या स्थानावर आहे.

या घोटाळय़ात माजी राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. बर्मुडामधील एका कंपनीत अमिताभ बच्चन यांचे शेअर्स असल्याची माहितीही समोर आली आहे. राजकारणात या पूर्वी केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांची ओमिडय़ा नेटवर्क कंपनीत भागीदारी असल्याचे आढळून आले आहे. तर भाजप खासदार आर . के. सिन्हा यांची एसआयएस सिक्युरिटीज ही कंपनीही या घोटाळय़ात समोर आले आहे. या शिवाय पॅराडाईज पेपर्स घोटाळय़ात अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचा आधीचा नवरा दिलन्शी याचाही समावेश आहे.

 

 

Related posts: