|Sunday, December 8, 2019
You are here: Home » leadingnews » राजकीय भूकंप होणार? ;उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

राजकीय भूकंप होणार? ;उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांनी या वृत्ताला दूजोरा दिला आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप होणार असल्याची चर्चा आहे.

राज्यातील सत्तेत रहायचे की नाही याबाब उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्याची माहिती समजत आहे. तसेच या दोघांमध्ये राजकारणातील सद्य परिस्थितीबद्दल चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने सामनातून भाजपविरोधात जोरदार टीका सुरू केली होती.त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे या भेटी मागे नेमके कोणते राजकारण सुरू आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Related posts: