|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुंबई, पुण्यात झालेली नाटके सोलापुरच्या रंगभूमीवर होणे गरजेचे

मुंबई, पुण्यात झालेली नाटके सोलापुरच्या रंगभूमीवर होणे गरजेचे 

प्रतिनिधी/ सोलापूर

मुंबई, पुण्यासारख्या शहरात विविध स्पर्धेतून चांगल्या एकांकिका सादर होत असतात. तेथील नवनवीन कलाकृती सोलापुरकरांना बघायला मिळत नाही. त्यामुळे मुंबई, पुणे शहरातील गाजलेल्या एकांकिकेचे सादरीकरण आपल्या सोलापुरच्या रंगभूमीवर व्हावे ती कलाकृती सोलापुरकरांना बघायला मिळावी अशी अपेक्षा ज्येष्ठ सिने-नाटय़ अभिनेत्री फैय्याज यांनी राज्य नाटय़स्पर्धेच्या उद्घटान वेळी केली.

  महाराष्ट्र सांस्कृतिक संचानालय तर्फे 57 व्या महाराष्ट्र राज्य नाटय़ मराठी हौशी स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिरात सिने-नाटय़ अ†िभनेत्री फैय्याज यांच्याहस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

  यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, ऍड. आनंद देशपांडे, अजय दासरी, दस्तगीर शेख, ममता बोल्ली, नंदकुमार सावंत, विश्वास देशपांडे, सुहास वाळुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.

  पुढे फैय्याज म्हणाल्या, पूर्वी राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे आलेले नाटक हेच व्यावसयिक स्वरूपात होवू लागले. त्यामुळे राज्य नाटय़स्पर्धेला व्यावसायिक रूप आले होते. 57 राज्य नाटय़ स्पर्धेला सकस मिळायला हवा. या स्पर्धेतून चांगले कलाकार, लेखक, विषय यावेत आणि स्पर्धेचा स्तर वाढणे गरजेचे असल्याचे फैय्याज म्हणाल्या.

  पुढे फैय्याज म्हणाल्या, मध्यंतराच्या काळात सोलापुरात चांगले नाटके येणे बंदच झाली होते. मुंबई, पुण्यात गाजलेली नाटके सोलापुरात का येत नाही याची कारणे ही शोधणे गरजेचे आहे. पंरतु आता मागील पाच वर्षामध्ये चांगले नाटके येवू लागलेली आहेत. आणि राज्य नाटय़स्पर्धेत तरूणाईचा सहभाग वाढत असल्याचे दिसून आले आहे.  त्यामुळे मुंबई, पुणे येथील गाजलेल्या एकांकिका सोलापुरच्या रंगभूमीवर होणे गरजेचे असून सगळ्यांनी एकत्रित येवून सुंदर कलाकृती होवु शकते असेही त्या म्हणाल्या.

अजय दासरी म्हणाले, आजपर्यंत झालेल्या राज्य स्पर्धेतून अनेक कलावंत झाले. देशभरातून सांस्कृतिक चळवळीला पुढे घेवून जाण्यासाठी सोलापुरचे योगदान आहे.  57 व्या राज्य नाटय़स्पर्धेतून कलावंत, तंत्रज्ञान, दिग्दर्शक निर्माण व्हावे अशी अपेक्षा दासरी यांनी व्यक्त केली.

  कार्यक्रमाचे प्रस्ताविक समन्वयक प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार बळवंत जोशी यांनी केले.

      रक्तअभिषेक नाटकाने रसिकांची मने जिंकली.

राज्य नाटय़ स्पर्धेच्या सुरूवातीस झंकार सांस्कृतिक मंचच्या वतीने रक्तअ†िभषेक  हे नाटक सादर झाले. पहिल्याच दिवशी रक्तअभिषेक या नाटकाचे दमदार सादरीकरण झाले आणि यामुळे रसिकांची मने जिंकली. या नाटकातील अभिनय पाहून रसिक खूश झाले. या नाटकातील  प्रकाश योजना उत्तमप्रकारे झालेली होती.