|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Top News » अश्रुचा एक थेंबही सत्ताधाऱयांसाठी धोकादायक : राहुल गांधी

अश्रुचा एक थेंबही सत्ताधाऱयांसाठी धोकादायक : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शायरीतून राहूल गांधींनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘एक आँसू भी हुकुमत के लिए खतरा है,तुमने देखा नाही आँखों का समुंदर होना’,असे ट्विट त्यांनी केले आहे.

नोटाबंदीनंतर बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डोळय़ात आसू आले होते.हाच फोटो त्यावेळी कॅमेऱया कैद झाला होता.त्यानंतर आज राहुल गांधींनी मुन्नवर राणांची शायरी शेअर करत हा फोटो पुन्हा शेअर केला.दरम्यान,याचबरोबर राहुल गांधींनी आणखी एक ट्विटही केले आहे.‘पंतप्रधान मोदींनी कोणताही विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे कोटय़ावधी इमानदार लोकांचे आयुष्य बरबाद झाले.त्या सर्व लोकांच्या आम्ही पाठीशी आहोत.’ देशभरात काँग्रेसकडून काळा दिवस साजरा करण्यात येत आहे.

 

Related posts: