|Sunday, September 22, 2019
You are here: Home » उद्योग » होंडाकडून ग्राझिया सादर

होंडाकडून ग्राझिया सादर 

मुंबई :

होन्डा मोटारसायकलने ग्राझिया ही नवीन दुचाकी भारतीय बाजारात दाखल केली. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यतेचा वापर करण्यात आला. ग्राहकांची बदलती आवड निवड पाहता डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये एलईडी हेडलॅम्प, डिजिटल मीटर, 3 स्टेप इको स्पीड इंडिकेटर असून कंपनीने ग्राहकांना नेहमीच उच्च दर्जाचे तंत्रज्ञान दिले असल्याचे कंपनीचे सीईओ मिनोरु काटो यांनी म्हटले. 125 सीसी इंजिन असून बीएस-4 चा समावेश आहे. स्पीडोमीटर, ट्रीम मीटर, ऑडोमीटर, इंधन गॉग, क्लॉक, टेकोमीटर यांचा समावेश आहे. सहा रंगात उपलब्ध असणाऱया या दुचाकीची दिल्लीतील एक्स शोरुममधील किंमत 57,897 रुपये आहे.