|Friday, December 6, 2019
You are here: Home » leadingnews » रघुराम राजन यांनी नाकारली ‘आप’ची ऑफर

रघुराम राजन यांनी नाकारली ‘आप’ची ऑफर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर व जागतिक ख्यातीचे अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी आम आदमी पक्षांने दिलेली राज्यसभेच ऑफर नाकारली आहे.शिकोगो विद्यापीठातील त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

राजन हे सध्या शिकोगो विद्यापीठात पूर्णवेळ अध्यापनाचे कार्य करत आहेत. याशिवाय ,भारतातील अनेक शैक्षणिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. हे सगळे अर्ध्यावर सोडण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही,असे त्यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. दिल्ली विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या तीन जागांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. या तिन्ही जागांसाठी आम आदमी पक्षाचे उमेदवार सहज निवडून जाऊ शकतात,अशी स्थिती आहे. मात्र आपल्या कोटय़ातून राजकीय नेत्याऐवजी विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला आहे.त्या अनुषंगाने ‘आप’ने राजन यांना ऑफर दिली होती. सध्याच्या अर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजन यांच्यासारख्या अर्थतज्ञाला राज्यसभेवर पाठवून मास्टस्ट्रोक मारण्याचा अरविंद केजरीवाल यांचा प्रयत्न हेता. परंतु राजन यांनी ही ऑफर नाकारल्याने तो प्रयत्न निष्फळ ठरला आहे.

 

Related posts: