|Monday, December 9, 2019
You are here: Home » leadingnews » 177 वस्तूंवरील जीएसटी 28 वरून18 टक्क्यांवर

177 वस्तूंवरील जीएसटी 28 वरून18 टक्क्यांवर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

177 वस्तूंवरील जिएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर करण्यात आले आहे जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. फक्त 50 वस्तूंवरील 28 टक्के जीएसटी कायम राहणार आहे.डिओ,शॉम्पू,सौंदर्य प्रसाधनांवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.

या निर्णयानंतर ग्रेनाईट, दाढीचे सामान, सौंदर्य प्रसाधन, मार्बल, चॉकलेट, च्युविंग गम, शेव्हींग क्रिम आणखी स्वस्त होणार आहे. फक्त 50 वस्तू 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये कायम ठेवण्यात आल्या आहेत. एसी हॉटेल, हाताने बनवलेले फर्निचर, प्लास्टिक उत्पादने आणि अन्य दैनंदिन वापराच्या वस्तूंवर जीएसटी कर आणखी कमी करण्यावरही विचार होणार आहे.  

Related posts: