|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » मुख्यमंत्र्यांप्रमाणे एखादी संस्था मराठवाडय़ात आणून दाखवा ; धनंजय मुंडेंचे पंकजांना आव्हान

मुख्यमंत्र्यांप्रमाणे एखादी संस्था मराठवाडय़ात आणून दाखवा ; धनंजय मुंडेंचे पंकजांना आव्हान 

पुणे / प्रतिनिधी :

मुख्यमंत्र्यांप्रमाणे ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यां’नीही एखादी तरी संस्था मराठवाडय़ात आणून दाखवावी, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना शुक्रवारी आव्हान दिले.

मराठवाडा प्रोफेशनल क्लबतर्फे आयोजित थेट संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंडे म्हणाले, मराठवाडय़ातील औरंगाबादमधील नियोजित आयआयएम नागपूरला नेण्यात आले. मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न रेंगाळत आहे. केवळ विदर्भाचा विकास करून महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सत्ताधाऱयांची मानसिकता आहे. मात्र, विदर्भासोबतच मराठवाडय़ाचाही विकास झाला पाहिजे. मराठवाडय़ाच्या मागास जिह्यात एमआयडीसी उभारल्या पाहिजेत. रेल्वेचा विस्तार झाला पाहिजे. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी याबाबत मराठवाडा स्वावलंबी व्हावा. अन्यथा, मराठवाडय़ाचे मागासलेपण दूर होणार नाही. राज्याचे वैदर्भीय मुख्यमंत्री मराठवाडय़ाच्या वाटय़ाची आयआयएमसारखी संस्था नागपूरला घेऊन जातात. जनतेच्या मुख्यमंत्र्यांनीही ही धमक दाखवावी, असा टोला त्यांनी लगावला.

Related posts: