|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » उद्योग » प्रारंभिक घसरणीनंतर बाजार किरकोळ वाढीसह बंद

प्रारंभिक घसरणीनंतर बाजार किरकोळ वाढीसह बंद 

निफ्टीत 13 अंकांचा वधार, सेन्सेक्स 33,315 वर बंद

वृत्तसंस्था/ मुंबई

भांडवली बाजारात शुक्रवारी दिवसभरातील कारभारांत बरेच चढ-उतार दिसून आले. प्रारंभी बाजारात थोडीशी घसरण दिसून आली परंतु दुपारपर्यंत तेजी परतली. दिवसभरात निफ्टीने 10,345 अंकांचा सर्वोच्च स्तर गाठला होता. तर सेन्सेक्सने 33,380.42 अंकांपर्यंत मजल मारली होती.

सेन्सेक्स 64 अंकांच्या (0.2 टक्के) वृद्धीसह 33,315 अंकांवर बंद झाला. तर एनएसईतील 50 मुख्य समभागांचा निर्देशांक निफ्टी 13 अंकांच्या (0.1 टक्के) किरकोळ वधारासह 10,322 अंकांवर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये नफावसुलीचा जोर दिसून आला. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.1 टक्क्यानी घसरत 16,563 अंकांवर बंद झाला. एनएसईचा मिडकॅप 100 निर्देशांकही 0.1 टक्क्यानी घसरत 19576 अंकावर स्थिरावला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 17,644 अंकांवर जवळपास सपाटच बंद झाला.

बँकिंग, एफएमसीजी, धातू, भांडवली वस्तू आणि ग्राहकोपयोगी वस्तू समभागांमध्ये तेजी दिसून आली. बँक निफ्टी 0.8 टक्के मजबूत होत 25,500 वर बंद झाला. एफएमसीजी व धातू निर्देशांक अनुक्रमे 0.75 टक्के आणि 0.4 टक्क्यांनी वधारले. बीएसईच्या भांडवली वस्तू निर्देशांकात 1.9 अंकांची तेजी आली. तर ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू निर्देशांक 1.4 टक्क्यांनी वधारला. परंतु वाहन, माहिती-तंत्रज्ञान, औषधनिर्मिती आणि तेल व नैसर्गिक वायू समभागांत विक्रीचा जोर दिसून आला.

दिग्गज समभागांची कामगिरी

आयसीआयसीआय बँक, महिन्द्रा ऍण्ड महिन्द्रा, एचयूएल, एलएंडटी आणि एसबीआय हे समभाग 2.3 ते 6.3 टक्क्यांनी वधारले. अरविंदो फार्मा, टाटा मोटर्स, एचपीसीएल, बॉश, रिलायन्स इन्डस्ट्रीज, टाटा मोटर्स डीवीआर, बीपीसीएल, एशियन पेन्ट्स आणि सन फार्मा हे समभाग 6.25 ते 1.4 टक्क्यांनी घसरले. मिडकॅपमधील अशोक लेलॅन्ड, हॅवेल्स, बायोकॉन आणि जीई टीऍण्डडी हे समभाग 3 ते 2.4 टक्क्यांनी घसरत बंद झाले. तर स्मॉलकॅपमधील अक्ष ऑप्टिफायबर, कॉफी डे, जैन इरीगेशन, सेलन एक्सप्लोरेशन आणि डीसीडब्ल्यू हे समभाग 10 ते 7.3 टक्क्यांनी घसरले.

Related posts: