|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » असशील तू मोठा स्टार..; जयंत पटलांनी शाहरूखला सुनावले

असशील तू मोठा स्टार..; जयंत पटलांनी शाहरूखला सुनावले 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पटलांनी अभिनेता शाहरूख खानला सुनावले आहे. अलिबागहून बोटमधून मुंबईला आलेल्या शाहरूखमुळे जयंत पटलांना अलिबागला जायला उशीर झाल्याने संतापलेल्या पाटलांनी ‘असशील तू मोठा स्टार,म्हणून काय संपूर्ण अलिबाग खरेदी केले काय?’,अशा शब्दांत शाहरूखला सुनावले असून या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

वाढदिवस साजरा करण्यासाठी शाहरूख खान त्याच्या अलिबागमधील फॉर्म हाऊसवर गेला होता. 3 नोव्हेंबरला तो अलिबागहून बोटीने गेट-वे ऑफ इंडियाला आला.यावेळी गेट-वेवर त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. नेमकी याचवेळी जयंत पाटील यांची बोट मुंबईहून अलिबागच्या दिशेने निघाली होती.पण शाहरूखची बोट पार्क होईपर्यंत पाटलांना वाट पाहावी लागली.यामुळे त्यांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी शाहरूखला त्याच्या चाहत्यांसमोरच सुनावले.