|Monday, January 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » येमेनच्या राजधानीवर सौदी आघाडीचे हवाई हल्ले

येमेनच्या राजधानीवर सौदी आघाडीचे हवाई हल्ले 

सना

 सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने बंडखोरांच्या ताब्यातील येमेनची राजधानी सना येथील संरक्षण मंत्रालयावर शनिवारी पहाटे हवाई हल्ले केले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हवाई हल्ल्यानंतर देखील लढाऊ विमानांच्या घिरटय़ा सुरूच होत्या असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. हुती बंडखोरांची माध्यम संघटना अल-मसीराने देखील 2 हवाई हल्ल्यांचे वृत्त दिले. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने याआधी देखील संरक्षण मंत्रालयावर हल्ले करत मोठे नुकसान घडवून आणले होते. तर नवा हल्ला सौदी अरेबिया आणि हुती बंडखोरांना समर्थन देणाऱया इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर घडवून आणला गेला. रियाध विमानतळानजीक हुती बंडखोरांनी डागलेले क्षेपणास्त्र सौदीच्या सुरक्षा दलांनी हवेतच नष्ट केले होते. यानंतर सौदी आघाडीने येमेनच्या सीमा बंद केल्या. बंडखोरांनी याला प्रत्युत्तर म्हणून सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये हल्ले घडवून आणण्याची धमकी दिली होती.

Related posts: