|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नाटकच माझे प्राधान्य आहे, नाटकामुळेच मी घडत गेलो- डॉ. गिरीश ओक

नाटकच माझे प्राधान्य आहे, नाटकामुळेच मी घडत गेलो- डॉ. गिरीश ओक 

प्रतिनिधी/ पणजी

नाटकाशी माझा संबध हा कॉलेजमध्ये असताना आला. आपण जर एक गोष्ट करत राहीले आणि त्यासाठी आपले कुणी कौतुक केले तर त्या कामाची ओढ आपल्याला लागते. आणि त्यामुळे मी आयुर्वेदीक विषयात पदवी घेऊनही नाटकाकडे वळलो. नविन असल्यामुळे या कालावधीत मी खुप अपमान, त्रास सहन केला. आणि हाच अपमान मी माझी ताकद म्हणून वापरली. आज मी जो काही आहे तो फक्त नाटकामुळे आहे. असे, प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी केले.

पणजी येथे कला अकादमीतर्फे आयोजित ‘हितगुज’ या कार्यक्रमात प्रेक्षकांशी संवाद साधताना हे सांगितले. यावेळी संवादक डॉ. अजय वैद्य यांनी त्यांची मुलाखत घेतली.

लहानपनापासून नाटकाची आवड अशी नव्हती. पण दहावी झाल्यानंतर मला हा नाटकाचा किडा लागला. माझे वडील एक विज अभियंता होते, त्यामुळे त्यांची बदली व्हायची तशी माझी शाळाही बदलायची. कॉलेजमध्ये असताना मी पहिले नाटक केले. यात मला बक्षिसही मिळाले. यातून मग वाट काढत मी आतंरमहाविद्यालयीक नाटक स्पर्धा, एकांकिका, राज्यस्तरीय नाटक स्पर्धा केल्या त्यामुळे नाटकाकडे मोठय़ा प्रमाणात ओढ निर्माण झाली. आणि याचमुळे मी कॉलेजनंतर नाटकाकडे वळलो आणि मुंबईत आलो. यादरम्यान मी एका हॉस्पिटलमध्ये आरएमओ म्हण्tन काम केले सोबत नाटकेही केली. या कालावधीत मला खुप त्रास सहन करावा लागला. पण यामुळे मला आपल्या माणसांची, मित्रांची. नातेवाईकांची, अन्नांची किंमत कळली.असे डॉ. ओक यांनी सांगितले.

नाटक, चित्रमालीका व सिनेमापर्यंतचा प्रवासः

‘आली लहर केला कहर’ हा माझा पहिला चित्रपट तर प्रभाकर नेवगी यांचा ‘साहेब विरुद्ध मी’ हा माझा पहिला व्यावसायिक नाटक. यानंतर मी ‘मला काही सांगायचे आहे’, ‘तो मी नव्हेच’, ‘दिपस्तंभ’, कुसुम मनोहर लेले, ‘यु-टर्न’, ‘श्री तशी सौ’ ही नाटके केलीत. या सर्व नाटकाचे प्रयोग हे जवळपास 100 पेक्षा अधिक झाले आहेत. यानंतर चित्रमालिका म्हटली तर अवंतिका, या गोजीरवाण्या घरात, चार दिवस सासूचे यासारख्या मालिकाही केल्या. तसेच सातच्या घरात आत, मुन्नाभाई एस.एस.सी, वाट पाहते पुनवेची, माझा नवरा तुझी बायको यासारख्या विविध मराठी सिनेमातही मी काम केले आहे. तर कोर्पोरेट, हिरोईन, व भेजा फ्राय 2 यासारखे हिंदी सिनेमाही केले. पण मला वाटते मालिका ही नष्ट होण्याचे माध्यम आहे कारण त्यांचा कंट्रोल आणखी कुणाच्या तरी हातात असतो. तर नाटक हे जिवंत असते. यासर्वात अभिनय हा एकच समान गोष्ट म्हणजे अभिनय त्यामुळे मला जास्त त्रास याचा झाला नाही. वेलकम जिंदगी हे माझे नविन नाटक आहे. आतापर्यंत मी 47 नाटके केली असून लवकरच पन्नाशी पूर्ण करण्याचा विचार आहे.

  गोवेकरांनी नेहमीच भरभरुन पेम दिले.:

गोव्यात कार्यक्रम असला की वेगळाच आनंद होते. देवाचा आर्शिवाद मिळालेली भूमी म्हणजे गोवा. येथे आलो की नेहमीच मन प्रफुलित होते. गोवा एवढे लहान राज्य असूनही इथले थेटर्स खुप प्रमाणात आहेत. आणि ते प्रकारे व्यावस्थित टिकवले आहे, हेही तेवढेच महत्वाचे आहे. मी गोव्यात खुप नाटकाचे प्रयोग केलेत. गोवेकरांनी नेहमीच मला भरभरुन प्रेम दिले. गोव्यातील माणसे, जेवण, भाषा, फेणी, स्थळे, येथील घरांची पध्दत नेहमीच मला आवडतात. येथे येऊन मन शांत होते.

 पणशीकर यांच्याशी दृढ नातेः

 पंत प्रभाकर पणशीकर यांच्याशी माझे दृढ नाते आहे. ते मला एका मित्राप्रमाणेच वागवतात. पंताच्या बाबतीत महत्वाचे म्हणजे मी जसे जसे नाटक करीत गेलो, त्याचप्रमाणे माझ्यात बदल होत गेला. आणि माझ्यातल्या बदलानुसार त्यांनी मला वागवले. असे आणि कुणीच केले नाही. ‘ तो मी नव्हेच’ या नाटकामुळे आम्ही खुप जवळ आलो. त्यांच्याबद्दल आदर, प्रेम सदैव माझ्या मनात राहील.

Related posts: