|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » जाहिरातीतून ‘पप्पू’शब्द वगळा; निवडणूक आयोग

जाहिरातीतून ‘पप्पू’शब्द वगळा; निवडणूक आयोग 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद  :

गुजरात विधानसभाच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाने भाजपाला जाहिरातीतून‘पप्पू’नावाचा वापर करण्यावर आक्षेप नोंदवला आहे. निवडणूक आयोगाने भाजपाला एकपत्र पाठवून निवडणूक प्रचाराशी निगडीत वाहिन्यांवरील जाहिराती,होर्डिंग,पोस्टर आणि बॅनर आदिंवर ‘पप्पू’नावाचा वापर करण्यावर आक्षेप नोंदवला आहे.

गुजरात निवडणूक आयोगानुसार काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधणे मर्यादचे उल्लंघन केल्यासारखे आहे.निवडणूक आयोगाने भाजपच्या प्रचार साहित्याचे परीक्षण केल्यानंतर म्हटले की, यामध्ये एका खास व्यक्तीमत्त्वाकडे इशारा करत ‘पप्पू’शब्दाचा अपमानजनक वापर केला जात आहे.दरम्यान भाजपने गुजरात निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या प्रचार साहित्यात कोणा एका व्यक्तीचे नाव घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आयोगाचा हा आदेश योग्य नसल्याचे भाजपने म्हटले आहे. गुजरातमध्ये 9आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

 

Related posts: