|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उसदर आंदोलन चिघळलं…

उसदर आंदोलन चिघळलं… 

पंढरपूर / प्रतिनिधी :

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याच सोलापूर जिल्हयात काही दिवसापासून उसदरांची कोंडी फ्gढटेना झाली आहे. उसदर आंदोलनास हिंसक वळण लागत आहे. यामधे उसदर आंदोलन आज चिघळले गेले. यामध्ये पंढरपूर-मंगळवेढा रोडवर गुरूवारी एक एसटीबस आणि दोन ट्रक फ्ढाsडण्यात आले. त्यामुळे आंदोलन अधिक चिघळण्याचा मार्गावर आहे.

कोल्हापूरात एफ्ढआरपीला 200 रूपये जास्त उस दर दिला. मात्र सोलापूर जिल्हयात कुठल्याच परिस्थितीमध्ये तोडगा निघेना झाला आहे. अनेक कारखानदार केवळ एफ्ढआरपीची भाषा करीत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटना उसाला 2 हजार 700 रूपये भावासाठी आग्रही आहेत. यामधेच दररोज उस वाहतुक करणा-या ट्रक्टरची टायर फ्ढाsडली जात आहे. आता पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर असणा-या तालुक्यातील अनवली नजीक एसटीबसवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी दगडफ्sढक केली आहे.

पंढरपूर-जत (एमएच 14 बीटी 3712 ) ही मंगळवेढा मार्गे जाणारी जत आगाराची बस होती. या बसच्या समोरच्या बाजूसच दगडफ्sढक करण्यात आली. विशेष म्हणजे यामधे कुठल्या प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. यामधे सर्व प्रवासी तसेच एसटीचे वाहक आणि चालक सुखरूप आहेत. याचवेळी एसटी बसच्या सोबतीनेच दोन ट्रकाची देखिल तोडफ्ढाsडही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. तसेच यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी देखिल केली. इतकेच काय उसाला 2 हजार 700 रूपयांचा दर घेतल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही. अशा आशयांची घोषणा देण्यात आल्या.

Related posts: