|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘न्युट्रल व्हय़ू’ ने नि:पक्षपणे पत्रकारिता करावी

‘न्युट्रल व्हय़ू’ ने नि:पक्षपणे पत्रकारिता करावी 

प्रतिनिधी / पणजी

‘न्युट्रल व्हय़ू’ ने नि:पक्षपणे पत्रकारिता करावी व आजही तशी जुन्या काळातील पत्रकारिता करता येते हे दाखवून द्यावे, अशी अपेक्षा डॉ. मंदाकिनी आपटे यांनी पणजीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना प्रकट केली. अशा या पत्रकारितेचे आजच्या काळात निश्चित कौतुक होईल. अलिकडच्या काळात नि:पक्ष पत्रकारिता फारशी दिसत नाही परंतु ‘न्युट्रल व्हय़ू’ ने तशी करून लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे असेही त्यांनी सांगितले.

पणजीतील ताज विवांतामध्ये ‘न्युट्रल फेस्टीव्हल’मधील कार्यक्रमात डॉ. आमटे बोलत होत्या. यावेळी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचेही व्याख्यान झाले. त्यांनी आपला बालपणापासून आतापर्यंतचा सारा जीवनपट उलगडून दाखवला. विद्यार्थी दशेपासून लग्न होईपर्यंत आणि त्यानंतर कोणकोणत्या गावात कसे दिवस काढले याची कहाणीच त्यांनी व्याख्यानातून सादर केली.

बाबांनी (बाब आमटे) कुष्ठरोगी पाहिला आणि त्यांनी त्यांच्यासाठी काम करून आनंदवन कसे निर्माण केले याचा सारा इतिहास डॉ. प्रकाश आमटे यांनी उलगडून दाखवला 1970 ते 2003 पर्यंत म्हणजे सुमारे 30 वर्षे आपण एकाच गावात वास्तव्य केले. रुग्णांसाठी काम केले व कुठेही बाहेरच गेलो नाही हे त्यांनी निक्षून सांगितले. बाबा कधीच घाबरत नव्हते परंतु, कुष्ठरोगी पाहून ते घाबरले त्यांना भिती वाटली पण नंतर मात्र अनंदवन निर्माण करून ती भिती त्यांनी पूर्णपणे घालवली असे डॉ. प्रकाश म्हणाले.

डॉ. आमटे यांच्याहस्ते प्रथम समई प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यांचा व सौ. आमटे यांचा ‘न्युट्रल व्हयू’ चे मालक उत्तमकुमार सलगोत्रा व प्रकाशक प्रिया सलगोत्रा यांनी सत्कार केला.  हे पत्र पाक्षिक स्वरूपाचे असून कोकणात ते ‘येवा कोकणात’ या नावाने मराठी, मालवणी भाषेतून काढण्यात येते तर  गोव्यात त्याचे स्वरूप ‘न्युट्रल व्हय़ू’ स्वरूपाचे आहे अशी माहिती रुपेश सामंत यांनी प्रास्ताविकात दिली.